
आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे योगदान : डॉ. कादंबरी बलकवडे
आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे योगदान : डॉ. कादंबरी बलकवडे
कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): : समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असून आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज येथे बोलतांना केले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कौमी एकता सप्ताह साजरा झाला. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर आणि देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गिय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजन झाले.
महिलांनी आपल्या कर्तुत्वातून समाजातील अनेक क्षेत्रात निर्धारपूर्वक आणि आदर्शावत काम केले असल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, समाजातील अनेक क्षेत्रात काम करतांनाही आदर्श कुटुंब बनविण्यात त्या मागे नाहीत, मुलांना घडविण्याचं काम महिलाच करीत असून नवी पिढी शिक्षित, संस्कारक्षम आणि आदर्शावत बनविण्यात महिलांचे योगदान सर्वार्थाने महत्वाचे आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचं सोनं करतात, आजही महिलांनी फायटर जेट ते आदर्श गृहीणी म्हणूनही लौकीक प्राप्त केला आहे. महिलांना समाजाच्या सर्व क्षेत्रात संधी मिळू लागली असून याबाबतीत महाराष्टाने देशाला दिशा देण्याचं काम केलं असल्याचे गौरवोदगारही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी काढले.