
अमळनेर बसस्थानकातून बस सोडल्या मात्र प्रवासी आले नाही
अमळनेर : आगारातून सकाळी बसेस सोडण्यात आल्या मात्र प्रवाशी न मिळाल्याने दुपारून बस बंद करण्यात आल्या माजी आमदार साहेबराव पाटील यांनी संपूर्ण आगार आणि बसेस नगरपालिकेच्या बंबाने निर्जंतुक केल्या . अमळनेर आगारातून लासुर , चोपडा , चाळीसगाव आदी बसेस सोडण्यात आल्या मात्र प्रवाशी मिळाले नाहीत त्यामुळे एस टी च्या फेऱ्या खाली गेल्या डिझेल वाया जाऊन वेळही वाया गेला.
अमळनेर आगराच्या तीन बसेस परप्रांतीय मजुरांसाठी नागपूर पर्यंत सोडण्यात आल्या. परप्रांतीय मजुरांना आणि तालुक्यातील प्रवाश्याना कोरोनाची लग्न होऊ नये तसेच प्रवाश्यांच्या सेवा करणाऱ्या चालक आणि वाहक याना कोरोनाचिलग्न होऊ नये, म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वतः नगरपालिकेचा बम्ब मागवून स्वतः थांबून अमळनेर बसस्थानक आणि एस टी बसेस संपूर्णपणे निर्जंतुक केले.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनीबस घेऊन जाणारे चालक व वाहक याना मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले. यावेळी बाबू साळुंखे , शिरीष पाटील , वाहतूक निरीक्षक आर एस पाटील , बोरसे , पी एस चौधरी , एस ए बोरसे हजर होते .
अमलनेरहून फक्त तीन प्रवाशी धरणगाव गेल्याची नोंद झाली असून अमळनेर आगराला तोटा झाला आहे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या माजी आमदार साहेबराव पाटील यांचे कौतुक होत आहे