किनगाव येथील हरवलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृतदेह शेतातील विहीरीत,आत्महत्या केल्याचा संशय.

जळगाव
Share This:

किनगाव येथील हरवलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृतदेह शेतातील विहीरीत,आत्महत्या केल्याचा संशय.

यावल दि.(सुरेश पाटील): तालुक्यातील किनगाव बु॥येथील राहणारे महेश पंढरीनाथ माळी शेतकरी हे हरवल्या बाबतची खबर यावल पोलीसात देण्यात आली होती त्यांचा शोध लागला असुन ते स्वतःच्या शेत विहीरीत मृत अवस्थेत आढळुन आले आहे.या संदर्भात मिळालेली माहीती अशी की किनगाव बु॥तालुका यावल येथील माळी वाडयात राहणारे महेश पंढरीनाथ माळी वय40वर्ष हे दि.16मे रोजी सकाळी9वाजेच्या सुमारास महेश माळी आपल्या शेतातुन जावु येतो असे सांगुन मोटर सायकल घेवुन शेतात गेले परंतु ते सायंकाळी7 वाजेपर्यंत घरी परत आले नाही म्हणुन कुटुंबातील मंडळीने शेतात जावुन शोध घेतले असता शेतातील विहीरीच्या ठीकाणी मोटरसायकल व विहीरी

जवळ त्याचे बुट मिळुन आली मात्र माळी हे दिसुन आले नसल्याने पुनश्च कुटुंबातील मंडळीने गावातील पट्टीच्या पोहणारा कैलास कडु थाटे यास बोलावून विहीरीत उतरून शोध घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला असता तो मिळुन आला नसल्याने अखेर महेश माळी यांचे मोठे भाऊ किरण पंढरीनाथ माळी वय 45वर्ष आपल्या नातेवाईकांकडे शोध घेतला तो मिळुन आला नाही,अखेर किरण माळी यांनी यावल पोलीसात भाऊ महेश माळी हरवल्याची खबर दिली असता,आज दि.17रोजी दुपारच्या सुमारास महेश माळी यांचा मृतदेह किनगाव शिवारातील त्यांनी केलेल्या नफ्याच्या शेतातील विहीरीत मिळुन आला असुन,माळी यांनी आत्महत्या केली की ते विहीरीत पडले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस अमलदार सुनिल तायडे हे करीत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *