यावल तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना- अपघातात रावेर तालुक्यातील 15 मजूर जागीच ठार

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना.
अपघातात रावेर तालुक्यातील 15 मजूर जागीच ठार.
धुळे जिल्ह्यातून पपई भरुन आयशर ट्रक येतो होता यावल कडे.
ट्रकचा गुल्ला तुटल्याने झाला अपघात.

यावल (सुरेश पाटील) :पपई वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक अपघातात रावेर तालुक्यातील आभोडा येथील 11, व विवरा,रावेर, केऱ्हाळा येथील 4 असे एकूण 15 जण अपघातात जागीच ठार झाले, अपघातातील मयतां मध्ये 2 बालकांचा,1अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. यावल तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याने संपूर्ण यावल रावेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दुर्दैवी घटना सोमवार दि.15फेब्रुवारी2021च्या मध्यरात्री घडली.
आयशर ट्रक क्र.एमएच-19झेड3568 हा धुळे जिल्ह्यातून नेर कुसुंबा येथून पपई भरून यावल कडे येत असताना बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर तथा यावल चोपडा रोड वरील किनगाव जवळील हॉटेल मन मंदिर जवळ वळणावर आयशर ट्रॅक्टर गुल्ला तुटल्याने मोठा भीषण अपघात झाला या अपघातात पंधरा जण जागीच ठार झाले तर काही जखमींना जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले अपघातात ट्रक ड्रायव्हर शेख जहीर शेख बदरुद्दीन राहणार मोमिनपुरा तालुका रावेर, बाबा इरफ़ान शहा फकीर वाडा रावेर, रमजान मोहम्मद तडवी राहणार आभोड़ा तालुका रावेर हे बचावले आहेत.
अपघातात मृतांची नावे पुढीलप्रमाणे शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार 30राहणार रावेर, सरफराज कासम तडवी 32,रा.केरहाळा तालुका रावेर, दिगंबर माधव सपकाळे 55 राहणार रावेर. यांच्यासह नरेंद्र वामन वाघ 25, दिलदार हुसेन तडवी 20, अशोक जगन वाघ 40, दुर्गाबाई संदीप अडकमोल 20, गणेश रमेश मोरे 5, सागर अशोक वाघ 3, शारदा रमेश मोरे वय 15, संगिता अशोक वाघ 35, यमुनाबाई शालिक इंगळे 45, कमलाबाई रमेश मोरे 45, सबनूर हुसेन तडवी 53, सर्व राहणार आभोडा तालुका रावेर हे एकूण पंधरा जण अपघातात जागीच ठार झाले मयताचे शेव यावल पोलीस साहाय्यक फौजदार नेताजी वंजारी हवालदार पाचपोळ यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलक, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पीएसआय अफजल खान पठाण भुसावळ नगर पालिकेचे प्रभारी माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यावल पंचायत समितीचे सभापती दीपक पाटील काँग्रेस यावल शहराध्यक्ष कधीर खान इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या भिशन अपघाताने यावल रावेर तालुक्यात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *