
आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट करून आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती दिली आहे.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजेश टोपेंनी यावर ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमधील आवाज माझा नाही, असं राजेश टोपेंनी सांगितलं. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कोरोनाबाबत अथवा खबरदारीच्या काही सूचना असतील तर राजेश टोपे हे पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात.
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 17, 2021