मंगेशकर कुटुंब आणि इतिहासाच्या असंख्य खुणा जोपासणारे थाळनेर

Featured जळगाव धुळे महाराष्ट्र
Share This:

 

इतिहासाच्या असंख्य खुणा जोपासणारे थाळनेर पूर्वी आणि आज ही उपेक्षित राहिलेलं गाव. तापी नदीत पाय सोडून बसलेला ऐसपैस बुरुज आणि त्याला खेटून पडकातरीही  दिमाखात उभा असलेला किल्ला थाळनेरच्या ऐतिहासिक  आणिसांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगतो. एकेकाळी खान्देशच्या राजधानीचा मान मिळविणाऱ्या थाळनेर मध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर असलेलं सप्तश्रृंगीदेवीचे मंदीर, तापीकाठावरची स्थळेश्र्वर, पाताळेश्वर आणि लतामंगेशकर यांच्या आई माईमंगेशकरयांच्या स्मृती निमित्त बांधण्यात आलेले खंडेरायाचे मंदिर, थाळनेरवर काहीकाळ राज्यकरणाऱ्या फारुकीघराण्यातील व्यक्तींच्या देखण्या कबरी (मकबरे) आणि अनेक देखण्या वास्तूववाडे आजही थाळनेरचे खानदेशातील महत्त्व नमूद करतात.

फोटो – चिंतामण पाटिल

 

फोटो – चिंतामण पाटिल

थाळनेरच्या या इतिहासाच्या पानांवर गाणकोकिळा लतादीदीच्या आईच्या माहेरच्या आठवणी देखील आहेत. आज 28 सप्टेंबर लतादीदीचा वाढदिवस. लतादीदीशी संबंधित काही गोष्टी जाणून घेण्यासाठी थाळनेर गाठले.ज्या कोकीळकंठाने सगळया जगाला मोहिनी घातली, त्या लतादीदींच्या जडणघडणीतला काही ना काही वाटा खान्देशच्या या मातीचाही आहे, ह्याची जाणीव होऊन प्रत्येक खान्देशी माणसाचे मन रोमांचित होते. तापीकाठच्या मऊसूत मातीतला मऊपणा लतादीदींच्या कंठात उतरल्यानेच त्यांचे गाणे इतके रसाळ झाले, अशी भावना खान्देशी माणसाला का होऊ नये?

28 सप्टेंबर हा लता मंगेशकरांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म जरी इंदोरला झाला असला, तरी खान्देशातल्या श्ािरपूर तालुक्यातील थाळनेरलाच त्यानंतरचे सगळे बालपण गेले. त्यांचे बालपण माहीत असलेले रमणभाई शहा हे एकमेव व्यक्तिमत्त्व आज थाळनेरात उरलेय. उतारवयामुळे आता त्यांच्याही स्मृती अधू झाल्या आहेत. फारशी ऊठबस त्यांच्याकडून होत नाही. त्यांना मुले आहेत, परंतु ती सगळी मुंबईत स्थायिक झालीत. मुले त्यांना तिकडे न्यायला तयार आहेत, परंतु रमणभाई आपल्या मातीला सोडायला तयार नाहीत. त्यामुळे मुलांनी त्यांच्या देखरेखीसाठी दोन माणसांची नियुक्ती केली आहे. त्यांना लतादीदींच्या आई माई मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर, लतादीदींची भावंडे, त्यांचे आजोबा हरिदास लाड यांचा चांगलाच सहवास लाभलाय. त्यांच्याप्रमाणेच काही बर्ुजुग थाळनेरकरांना भेटल्यावर लतादीदींच्या या कुटुंबाबाबत अनेक विस्मयकारक गोष्टी समजतात.

धुळे जिल्ह्यातील श्ािरपूर तालुक्यातील थाळनेर हे ऐतिहासिक वारसा असलेले एक गाव. तापी नदीच्या काठावरील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या थालेश्वर महादेवाच्या मंदिरावरून बारा पाडयांच्या या गावाला थाळनेर असे नाव पडले. येथे किल्ल्याची पडकी भिंत व तापीच्या काठावर ढासळलेल्या बुरुजाचे अवशेषही आढळतात. बुरहाणपूरच्या सरदार घराण्याच्या समाध्या असलेल्या देखण्या 7 हजिऱ्या येथे आहेत. आता पुरातत्त्व खात्याकडे त्यांचा ताबा गेलाय. काही जुन्या गढयांचे अवशेषही येथे दिसतात.

ब्रिटिश राजवटीत थाळनेर एक महत्त्वाचे केंद्र होते. हरिदास रामदास लाड (गुजराथी) ही येथली प्रतिष्ठित असामी. गावातील सगळे र्निणय हरिदासशेठ यांच्याश्ािवाय होत नसत. त्या काळातल्या ज्या मोजक्या भारतीयांना मतदानाचा अधिकार होता, त्यातील ते एक. इंग्रज साहेबाला ते मुंबईत भेटायला गेले, तर त्यांना घ्यायला मुंबई स्टेशनावर साहेब बग्गी पाठवायचा, इतका त्यांचा वट (मान) होता. हरिदासशेठ हे जसे गावचे कर्ते कर्तबगार पुढारी होते, तसे ते कमालीचे रसिकही होते. गावातील श्ािवराम कापुरे (श्ािंपी) यांची मुलगी ताईबाई (आणखीही काही वेगवेगळी नावे लोक सांगतात) हिच्याशी हरिदासशेठ यांचा प्रेमविवाह झाला. श्ािवराम कापुरे यांच्या सर्वच चार मुलींनी आंतरजातीय विवाह केले होते, हे विशेष. ताईबाईंना दामोदर नावाचा एक भाऊ होता. त्याला सगळा गाव मामा म्हणायचे. ताईबाई या अतिशय स्वरूपवान होत्या. ताईबाई जशा रूपवान होत्या, तसा त्यांचा गळाही गोड होता. तसेच हरिदासशेठदेखील राजबिंडे होते असे सांगतात. ताईबाई व हरिदासशेठ लाड यांना चार मुली झाल्या – नर्मदा, यमुना, गुलाब व माई. या चारही कन्या अतिशय रूपवान. हरिदासशेठ रसिक असल्याने त्यांच्याकडे नेहमीच गाण्याचे व नाटकांचे कार्यक्रम व्हायचे. संगीत नाटकांचे तर त्यांना विलक्षण वेड.

 

फोटो – चिंतामण पाटिल

महाराष्ट्रातल्या मोजक्या गुणवंत नाटक कंपन्यांपैकी दीनानाथ मंगेशकरांची एक नाटक कंपनी होती. दीनानाथ आपली नाटक कंपनी घेऊन खान्देशातही यायचे. धुळयात तर त्यांचा प्रवास नेहमीचाच. धुळे प्रवासातील काही दिवस ते थाळनेरला यायचे. हरिदासशेठ थाळनेरमध्ये त्यांचे नेहमीच आगतस्वागत करीत. कधीकधी दीनानाथांचा मुक्काम थाळनेरात दोन-दोन महिने असायचा. या प्रवासादरम्यानच हरिदासशेठ यांची मोठी कन्या नर्मदा हिच्याशी दीनानाथांचा विवाह झाला. परंतु नर्मदाची प्रकृती सतत बिघडत असे. विवाहाच्या सहा महिन्यांच्या आतच तिचे निधन झाले. त्या वेळी हरिदासशेठ यांची दुसरी कन्या माई हिच्याशी दीनानाथांचा पुन्हा विवाह लावून देण्यात आला. या काळात त्यांचे वास्तव्य खान्देशात अधिक राहिले. याच कालखंडात इंदोर येथे नाटक कंपनीचा दौरा असताना लतादीदींचा जन्म झाला. जन्मानंतरचे दीदींचे सगळे बालपण इथेच गेल्याचे थाळनेरातील काही बर्ुजुग सांगतात. प्रिया तेंडुलकर यांच्याशी दूर्रदशनवरच्या काही कार्यक्रमांमध्ये लतादीदींनी येथल्या आठवणी सांग्ाितल्याही आहेत. परंतु सिनेसृष्टीतील त्यांच्या प्रवेशानंतर मात्र त्यांना थाळनेरला येता आले नाही.

मंगेशकर कुटुंबाच्या काही स्मृती आजही थाळनेरात आढळतात. त्यापैकी एक म्हणजे माई मंगेशकर यांचे वडील हरिदास लाड यांनी मंगेशकर कुटुंबाला राहण्यासाठी बांधून दिलेले घर अजूनही जसेच्या तसे आहे. अर्थात ते मंगेशकर कुटुंबाने थाळनेर सोडल्यानंतर काही वर्षांनी विकण्यात आले. त्या वेळी पुरुषोत्तम हरिदास लाड यांनी परबत संपत तंवर यांना ते विकून टाकले होते. सध्या तंवर कुटुंबाकडे या घराचा ताबा आहे.

आपले वडील हरिदास लाड यांच्या स्मृतीनिमित्त गावाबाहेर माई मंगेशकर यांनी खंडेरायाचे टुमदार मंदिर बांधले आहे. याश्ािवाय रमणभाई शहा यांच्या घराजवळच हरिदासशेठ लाड यांच्या वाडयाची पडकी इमारत आजही दिसते. मंगेशकर कुटुंबाच्या या काही आठवणी येथे आहेत.

लतादीदींचे हे आजोळ असले, तरी त्या कधी येथे आल्या नाहीत. मात्र हृदयनाथ मंगेशकर यायचे. थाळनेरला हृदयनाथांची शेवटची भेट 1993ची. गेल्या 20-25 वर्षांत मंगेशकरांपैकी कोणी आलेले नाही.

गोवेकर मंगेशकरांचे नाते दूरवरच्या खान्देशशी असल्याची ही कथा रोमहर्षक वाटते. लतादीदींचा वाढदिवस काही रसिक मंडळी आजही गावातील गणपती मंदिरात दर वर्षी करतात. भावे आडनावाचे एक श्ािक्षक गेली अनेक वर्षे त्यासाठी मेहनत घ्यायचे. परंतु गानकोकिळेच्या आपल्या गावातील वास्तव्याबद्दल नवी पिढी अनभिज्ञ असल्याचे जाणवले. मंगेशकरांच्या मुंबई येथील घरी काही वर्षांआधी गावातील अनेकांचे जाणे-येणे असायचे. परंतु रमणभाई शहा सोडले, तर या कुटुंबाशी इतरांचा संपर्क तुटलेला आहे.

आज लतादीदी 90 वर्षांच्या होत आहेत. 28 तारखेच्या रात्री गणपती मंदिरात आजही थाळनेरात लतादीदींचा वाढदिवस होईल. लतादीदी जरी बालपणीच आपले आजोळ सोडून मुंबईला गेल्या असल्या, तरी आजोळची काही मंडळी आजही आवर्जून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. ‘तुझं आजोळ तुझी आठवण करतं’ हा निरोप लतादीदींपर्यंत पोहोचला पाहिजे, हे थाळनेरातील अनेकांना वाटते. आजवर त्या कधी इकडे आल्या नाहीत, मग या वयात त्या येतील यावर थाळनेरकरांचा विश्वास नाही.

मंगेशकर कुटुंबाची ओळख म्हणून आज खंडेरायाच्या मंदिराश्ािवाय दुसरे ठिकाण नाही. गावात या कुटुंबाच्या स्मृती जिवंत राहाव्यात, म्हणून काहीतरी उभे राहायला हवे असे गावातील काही मंडळींना वाटते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *