धुळे: सुरत नागपूर महामार्गावर भीषण अपघात

Featured धुळे
Share This:

अजंग गावाजवळ भीषण अपघात

धुळे (तेज समाचार प्रतिनिधी ):  : महामार्ग क्रमांक ६ वरील फागणे-कासविहिर शिवारात केमिकल घेऊन जाणार कंटेनर व ट्रॅव्हल्स बस यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघातात दोन्ही वाहनांनी घेतला पेट घेतला आहे. त्यात जीवित हानी झाल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

मुकटी जवळील कासविहिर गावालगत महामार्ग क्रं,६ ;वर ट्रॅव्हल्स बस आणि केमिकल कंटेनरचा समोरासमोर अपघात झाल्याने दोन्ही गाड्यांच्या भीषण स्फोट झाला, हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. या अपघातानंतर आजू बाजूच्या २ की.मी परिसरात पर्यन्त स्फोट झाल्याचा हादरा बसला. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक भयभीत झाले. या घटनेनंतर बऱ्याच उशीरा पर्यंत यंत्रणा पोहचू शकल्या नाहीत. आजूबाजूचे ग्रामस्थ नागरिक ,पदाधिकारी ,कार्यकर्ते, यांनी घटनास्थळी चौकशी करण्यासाठी गेले असता, त्यांना झालेला भीषण आगीमुळे जवळ जाता येत नसल्याने, त्या सदर घटनेची सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *