
टेम्पोची कारला धडक- दोन जखमी
पुणे (तेज समाचार डेस्क): एका टेम्पोने कारला जोरात धडक दिली. यामध्ये कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात 29 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता बोराडेवाडी रोडवर घडला.
संतोष मनोहर गोरे (वय 40, रा. मोशी), संगीता संतोष गोरे अशी जखमींची नावे आहेत. संतोष यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक अमोल शरद बावळे (वय 25, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो (एम एच 06 / जी 7783) हयगयीने, जोरात चालवून फिर्यादी यांच्या कारला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी संतोष यांच्या छातीला मुक्कामार लागला. संतोष यांच्या पत्नी संगीता यांच्या डोक्याला व मानेला मार लागला आहे. संतोष यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.