तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक करीत 38जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा

Featured
Share This:

तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक करीत 38जणांच्या नोंदी केल्या म्हणुन एका विरूध्द आयटी अँक्ट अन्वये गुन्हा.

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चालकाने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात महसुल विभागासह ईतर सर्व शासकीय कार्यालया मधे मोठी खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासुन तहसिल कार्यालयात पीएम किसान संर्दभातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या.तरी देखील38नोंदी झाल्या कशा?या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संशय आल्याने चौकशी केला असता हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसिल कार्यालयातील लिपीक दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तीन वर्षापासुन तहसिल कार्यालयात त्यांच्याकडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्याअनुशंगाने ते मागील दोन वर्षापासुन पि.एम.किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज पाहत आहेत.सदर योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन),आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे,चुकीचा खाते क्र.असल्यास ते दुरुस्त करणे, शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे इत्यादी कामे ते ऑनलाइन पि.एम.किसानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसिलदारांच्या आदेशाने काम करत होते.मात्र दि.14 ते30 सप्टेंबर या कलावधीत तहसिलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसिलदार महेश पवार यांच्या परवानगीनेचं उपलब्ध् व्हायचे म्हणुन ते देखील बंद होते. दरम्यान दि.14ते30सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पिएम किसान संकेतस्थळावर 38 शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनात आले व त्यांनी या बाबत थेट तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली तेव्हा तहसिलदारांच्या लॉगीन आय.डी. या पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हँक करून ललित नारायण वाघ रा.किनगाव ता.यावल यांना कोणताही अधिकार नसतांना38 शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले व या प्रकरणी आयटी अँक्ट सह इतर कलमान्वये ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील,उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.
आधी पण नोंदी केल्याचा संशय.
पैसे घेवुन पि.एम.किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या म्हणुन आपण आपल्याच कर्मचाऱ्यांवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याच्या सुचना केल्या तेव्हा38नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावुन त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतल्याचे त्यांनी सांगीतंले तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसुल प्रशासन बदनाम होते.असे तहसिलदार महेश पवार यांनी सांगीतले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *