तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्या व्हाईट लिलीचा अभ्यासक्रमात समावेश राज्यभरात सर्वत्र कौतुक

Featured जळगाव
Share This:

तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्या व्हाईट लिलीचा अभ्यासक्रमात समावेश राज्यभरात सर्वत्र कौतुक

 

यावल ( सुरेश पाटील ) : यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी लिहिलेले “व्हाईट लिली ” या काव्यसंग्रहातील “तू एकदा पूर्वेचा ” या कवितेचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात समावेश केल्याने तहसीलदार जितेंद्र कुवर यांचे महाराष्ट्रभरातून कवी व लेख का मधून कौतुक होत आहे

हा अभ्यासक्रम बीए. बीकॉम . बीएस्सी . पदवी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२० / २१ पासून अभ्यासात असणार आहे

ही कविता त्यांच्या व्हाईट लिली या काव्यसंग्रहात समाविष्ट असून काव्यसंग्रह 2019 मध्ये ग्रंथाली प्रकाशन मुंबई ने व्हाईट लिली हे प्रकाशित केले आहे यावल तहसीलदार जितेंद्र कुवर हे कवी व लेखक ही असून यापुढेही ते हे असे काही ही काव्य करणार असल्याचे त्यांनी दैनिक देशदूत’ची बोलताना सांगितले

अतिशय सोज्वळ शांत स्वभावाचे व प्रशासनात कुठलीही कुचराई न करता पारदर्शी काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची यावल तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात ओळख आहे यावल तालुक्यातील असे भाग्य की, असे तहसीलदार यावल तालुक्याला लाभले तालुक्यामध्ये हे तहसीलदार पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत असून त्यांच्या ” तू एकदा पुनवेचा ” या कवितेच्या समावेशामुळे या वलचे ही नाव महाराष्ट्रभर अजरामर झाले त्यामुळे त्यांचे यावल तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार व नागरिक व ग्रामस्थ कौतुक करीत आहेत

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *