तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याहस्ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणुन प्रशस्तीपत्र

Featured जळगाव
Share This:

तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याहस्ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणुन प्रशस्तीपत्र

छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचा सामाजिक कौतुकास्पद उपक्रम.

यावल दि.3 ( सुरेश पाटील ) यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या हस्ते आणि डॉक्टर कुंदन फेगडे, डॉक्टर प्रशांत जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. बी. बारेला यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तालुक्यातील विरावली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे अध्यक्ष एँडव्होकेट देवकांत बाजीराव पाटील यांनी कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत जिवाची पर्वा न करता बाजी लावून लोकहितासाठी आपले जिवन समर्पित करून शासनाच्या माध्यमातून जन सेवा कार्य करीत असल्या बद्दल कोविड–19 च्या आपत्तीमध्ये आपले कौटुंबिक जीवन बाजूला ठेऊन समाजावर आलेल्या महामारीच्या संकटात कोरोनाशी दोन हात सामना करत आहात.त्यांचे हे योगदान देश, राज्य स्मरणात ठेविल त्यांचा एक छोटासा प्रयन्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या संस्थेने तहसीलदार साहेब यांच्या शुभहस्ते आरोग्य विभागात प्रमुख भुमिका बजावत असलेले डॉ.बी.बी.बारेला, एन.एस. घोडके, विजय वाढे, सूर्यकांत पाटील, शिवानंद कानडे, वैशाली बैरागी, संगीता गावित या सर्व यावल ग्रामीण रुग्णालयातील सर्व कोरोना योद्धाचा सत्कार केला . तहसीलदार साहेब यांनी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टिमला शुभेच्या देत पुढील वाटचालीस शुभेछया दिल्या व कार्यक्रमाचे आयोजना बद्दल छत्रपती फाऊंडेशन संस्थेचे ही कौतुक केले. या कार्यक्रमा ला छत्रपती फाऊंडेशन चे संचालक किशोर माळी , हितेश गजरे , विनोद पाटील , राकेश सोनार,चुंचाळे गांवाचे पोलीस पाटील गणेश पाटील , आशुतोष पाटील,राजेंद्र पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड देवकांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले तर स्वराज्य फाऊंडेशन चे ऍड. भरत चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *