यावल तालुक्यातील शिक्षकांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी दिले 4 लाख रुपये

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यातील शिक्षकांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी दिले 4 लाख रुपये.

तहसीलदार,गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी प्रसिद्धी पासून चार हात लांब.

तालुक्यात चर्चेचा विषय.

यावल (सुरेश पाटील): कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात कमी पडत असल्याने आणि ऑक्सिजन प्रकल्प कमी असल्याने ऑक्सिजन प्रणालीला आर्थिक मदत म्हणून यावल तालुक्यातील शिक्षकांनी 4 लाख रुपयाची मदत करून समाजापुढे एक आदर्श घातला यांच्या उपस्थितीत 4 लाख रुपयांची मदत शिक्षकांनी केली त्यावेळेस मात्र उपस्थित यावल तहसीलदार गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी नेहमीप्रमाणे प्रसिद्धी पासून चार हात लांब राहून तालुक्यातील जनतेला आणि इच्छुक देणगीदाराच्या माहितीसाठी प्रसिद्धी करणेकामी कुचराई केली असल्याचे तसेच तालुक्यातील संबंधित अधिकारी कर्मचारी हे त्यांचीं शासकीय कामे करताना एकाच वेळेला सर्व माध्यमांना माहिती देत नसल्याचे प्रसिद्धी माध्यमात बोलले जात आहे.
जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात फैजपूर सेंटर करिता सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन बसविण्यासाठी लोकवर्गणीची तसेच आर्थिक मदतीची गरज निर्माण झाल्याने प्रांताधिकारी कैलास कडलक, तहसीलदार महेश पवार,गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर यांना स्वेच्छेने देणगी स्वरूपात रक्कम द्यावी यासाठी आव्हान केले होते ते आव्हान संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून किंवा जाहीर प्रसिद्धीपत्रक वाटून केले होते किंवा कसे?याबाबत तालुक्यातील जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तालुक्यातील संबंधित अधिकारी आपल्या चांगल्या कामकाजाचे एकाच वेळेला प्रसिद्धीपत्रक काढून जनहिताच्या माहितीसाठी प्रसिद्धीमाध्यमांना माहिती का देत नाहीत?याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी फैजपूर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याना आपल्या शासकीय कामकाजाची माहिती जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्धी माध्यमांना एकाच वेळेला देणे संदर्भात कार्यवाही करावी असे जनतेसह प्रसिद्धी माध्यमांमध्ये बोलले जात आहे.शिक्षकांनी सुद्धा 4 लाख रुपये मदत दिली याबाबत फक्त फोटो सेशन करून आपले काम प्रसिद्ध केले का? भरीव अश्या आर्थिक मदतीची प्रसिद्धी केली असती तर तालुक्यातील इतर देणगीदार सुद्धा पुढे येऊन शासनाला मोठी आर्थिक मदत केली असती असे सुद्धा बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *