रमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA”अध्यक्ष शे.शरीफ शे.सलीम

Featured जळगाव
Share This:

रमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA”अध्यक्ष शे.शरीफ शे.सलीम

यावल (सुरेश पाटील): सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून रमजान ईद हा मुस्लिम बांधवासाठी एक मोठा सण असतो.रमजान ईद13किंवा14मे2021रोजी(चंद्र दर्शन प्रमाणे)असल्याने व रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात.ईदच्या वेळी नवीन कपडे,वस्तू खरेदी करतात.पर्यायाने आर्थिक टंचाई येऊ नये म्हणूनन राज्यातील सर्व खाजगी,जि.प.मनपा, नगरपरिषद,प्राथमिक व माध्यमिक शाळेतिल शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहे एप्रिल2021चे वेतन व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मार्च व एप्रिल2021मधील मे वेतन आणि राज्यात 20%व40%वेतन देय होणाऱ्या शाळाचे ऑफलाईन वेतन ईद पूर्वी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांत ईद च्या3दिवस आधी करण्यात यावे.अशी विनंती ऑल इंडिया आइडियल टीचर्स एसोसिएशन चे रावेर तालुका अध्यक्ष शे.शरीफ शे. सलीम यानी निवेदनाद्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड़ यांच्या केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *