TCS तर्फे आर.सी.पटेल अभियांत्रिकीच्या ४३ विद्यार्थ्यांची ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनीअर पदासाठी निवड

Featured धुळे
Share This:

यापैकी८विद्यार्थ्यांची  TCS च्या  कोडव्हीटास्पर्धे द्वारे थेट निवड.

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील अग्रनामांकित टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस (TCS) तर्फे झालेल्या कॅम्पस मुलाखतीत येथील आर.सी.पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतांनाच ४३ विद्यार्थ्यांची वार्षिक रु.३.३६ लाख या वेतनश्रेणीवर ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनीअर या पदासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील  यांनी दिली आहे.

टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हीसेस, पुणे (TCS) कंपनी चे जगभरातील ४६ देशात २३० कार्यालये असुन माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ३ लाख हून अधिक तज्ञ सल्लागार कार्यरत आहेत. जागतिक बाजारात सॉफ्टवेअर निर्यातीत टी.सी.एस. सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात सदर कंपनीने लक्षावधी डॉलर चा व्यवसाय केला आहे. अश्या अग्रगण्य कंपनीतर्फे प्लेसमेंट साठी महाविद्यालयांचे  मानांकन केले जाते.उत्तर महाराष्ट्रात सदर कंपनीचे मानांकन मिळवणारे आर. सी. पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर हे अभियांत्रिकी महविद्यालय आहे.राज्यभरात नुकतेच कंपनीतर्फे अभियांत्रिकी महविद्यालयांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते.यापैकी उत्तर महाराष्ट्र विभागासाठीच्याकॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन आर. सी. पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनचमहाविद्यालयात विद्यार्थ्यांची अॅप्टीट्युड, ई-मेल रायटिंग व मौखिक मुलाखत यांचा सराव सुरु होता.

या नुसार सर्वप्रथम उच्च गुणवत्ता असलेले विद्यार्थी मिळवण्यासाठी कंपनीच्या ‘कॅम्पस कम्युन’ मार्फत राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने ‘कोडव्हीटा’ नामक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या अनेक खडतर फेर्यांमधून यशस्वी रित्या पुढे जात महाविद्यालयाच्या१) पाटील धनंजय नाना २)गायकवाड निरज मनिष३)सचिन गारकर४)भामरे शिवकुमार जगन्नाथ ५) मयूर अंबालाल देशमुख६)लोहार धिरज भरत ७) सावंत हर्षाली यशवंत आणि ८) पाटील योगेश हेमराज या ०८विद्यार्थ्यांची ट्रेनी सॉफ्टवेअर  इंजीनीअर पदावर थेट निवड झाली.यानंतर नुकतेच शिरपूर येथे महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट व मुलाखत आयोजित करण्यात आल्या. यात येथील आर.सी.पटेल इंस्टीटयूट ऑफ टेकनोलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महविद्यालयातील अंतिम वर्षातील विविध विद्याशाखांतील तेजस्विनी पाटील, आकाश शर्मा, प्रशांत पावर,मयूर भावसार,कल्याणी पाटील,जयराज पावर,मोहम्मद अनस खान, गणेश देसले, यश गजेंद्र गुजराती, सोलंकी मोनिका धर्मेंद्रसिंह, सागर शिंपी, नरेंद्रकुमार पाटील, दिव्या सुनील पाटील,यश चौधरी,रोहन कलाल, करीना गोधवानी, उत्सव जयेंद्र ब्रह्मभट्ट, श्रुती अजय गुजराती, विनय वैद्य, श्रेयाबेन अग्रवाल, भूषण बाविस्कर,दर्शन राणे,दिपक पाटील,मानसी अग्रवाल, गुंजन भोळे,निकिता बोरसे,चंद्रशेखर वाडेकर,प्रियंका बडगुजर,भावना भडणे,विराज माळी,हिरल ठाकरे,निखिल मुसळे,पृथ्वीराज लोहार,विशाल पाटील,पियुष त्रिवेदीया३५विद्यार्थ्यांची म्हणजेच महविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतांनाच एकूण ४३ विद्यार्थ्यांचीवार्षिक रु.३.३६ लाख या वेतनश्रेणीवर ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनीअर या पदासाठी वर्णी लागली आहे. तसेच महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले ४५०हुन अधिक विद्यार्थी टी.सी.एस.  कंपनीत विविध पदांवर कार्यरत आहेत.ऑनलाई पद्धतीने दोन दिवस चाललेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेत टी.सी.एस. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने सहभाग घेतला.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुखप्रा. मिल्केश जैन, प्रा.सचिन परदेशी, प्रा.पंडित पाटील, प्रा.लोमेश महाजन, प्रा. वेदिया रघुवंशी व प्रा. विनीत पटेलयांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालकजयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिवप्रभाकर चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहासशुक्ल, प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, ट्रेनिंग अँडप्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.मिल्केश जैन,जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *