
तरुणांनी तोड़-फोड, आंदोलनापासून लांब रहावे – संत बाबा उमाकांत महाराज
मथुरे चे परमसंत बाबा जयगुरुदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांत महाराज यांनी देशाच्या सर्व तरुणांना आवाहन केले आहे कि, तरुणांना देशाच्या भविष्याच्या रुपात पाहिल्या जाते. ते देशाचे भविष्य आहे. अशामध्ये जर तरुणांना आपली कोणतीही योग्य किंवा अयोग्य मागणीसाठी तोड़-फोड आंदोलन, धरणा, संप करतात, तर यानी आपल्याच देशाच्या मालमत्तेचे नुकसान होईल, देशाचे नुकसान होईल. आपल्याच देशाच्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करवा लागेल. देश प्रगति करण्या ऐवजी अजून मागे जाईल. आणि ही स्थिति न देशा साठी आणि न तरुणांसाठी योग्य ठरेल. काही स्वार्थी राजकारणी लोकं आपल्या अनुचित स्वार्थासाठी तरुणांच्या मदतीने देशाची शांतता भंग करण्याचा कट करीत आहे. अशा लोकांचा कट समजून, त्यांचा सांगण्यावरून तोड़-फोड आंदोलन करू नका, कारण यानी कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही, तर देशाचे नुकसान होते. देश भक्त बना, सर्वांशी प्रेम करा आणि कोणत्याही धर्माचा, कोणाच्या ही गुरुंचा, पीर-पैगम्बरांची अवमानना करू नका, निंदा करू नका. बाबा उमाकांत महाराजांनी तरुणांना सर्व प्रकारच्या नशांपासून दूर रहाण्याचा ही संदेश िदला आहे. ते म्हणतात कि नशा स्वत:च्या शरीरा साठी, स्वत: साठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या राज्या व देशा साठी सुद्धा फार घातक आहे. म्हणुन सर्वांनी सर्व प्रकारच्या नशेपासून सदैव लांब रहावे.
– शाकाहारी होण्याचे आवाहन
देशाच्या वर्तमान परिस्थिति बद्दल आण्िा नवनवीन आजारांवर चिंता व्यक्त करतांना संत उमाकांत महाराज यानी एका प्रेस विज्ञप्ति देशाच्या लोकांसाठी जाहीर केली आहे. या विज्ञप्ति मध्ये त्यांनी सांगीतले आहे कि बाबा जयगुरुदेव सदैवच देश-विदेशच्या लोकांना हा संदेश देत होते कि संपूर्ण मानवजातीला शाकाहारी होण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यकाळात अशा आजारांना आपल्याला सामोरे जावे लागेल, ज्या आजारांचा उपचार कोणत्याही डॉक्टरांकडे नसेल. हे आजार संपूर्ण विश्वासाठी मोठे संकट बनू शकतात. आज विश्वातील विकासशील आणि संपूर्ण रूपाने आत्मनिर्भर देश चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना वायरस ने धुमाकूळ घातला आहे. ही घटना बाबा जयगुरुदेव यांच्या भविष्यवाणीला चरितार्थ करीत आहे. चीन सारखा शक्तिशाली आणि आत्मनिर्भर देश सुद्धा कोरोना वायरसचा सामना करण्यात स्वत:ला असमर्थ समजत आहे. म्हणुन संत उमाकांत महाराज यांनी देशाच्या लोकांना आवाहन केले आहे कि आज पासूनच पूर्णपणे शाकाहारी होण्याचा संकल्प घ्या आणि गंभीर आजारांपासून स्वत:ला वाचवा.
– जयगुरुदेव नावाचे स्मरण करावे
संत उमाकांत महाराज म्हणतात कि आजच्या या युगात जयगुरुदेव हे नाव जागृत परमात्माचे नाव आहे. संपूर्ण मानव जातिची या नावाने रक्षा होईल. जितके या नावाचे स्मरण केले जाईल, तेवढे संकटापासून, आजारांपासून रक्षण होईल. म्हणुन संपूर्ण देशावासियांशी अपील आहे कि संपूर्णपणे शाकाहारी होऊन जयगुरुदेव या नावाचे जास्तीत जास्त स्मरण करावे. बाबाजींनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले कि अयोध्या मध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या मंदिर निर्माणामध्ये तन-मन आणि धन ही सेवा शाकाहारी, नशामुक्त आणि सदाचारी लोकांचीच स्वीकारावी, जेणे करून भगवान रामाच्या आदर्शाचा लोक अम्मल करतील आणि त्यांच्या शक्तिचा अनुभव घेतील. त्यांनी मजीद निर्माणाबद्दल सुद्धा हेच सांगितले आहे.
– औषधीय शेतीला शेतक-यांनी प्राधान्य द्यावे
बाबाजी म्हणतात कि शेतक-यांनी पारंपरिक शेती सोबतच जडी-बूटी आणि औषधीय झाडांची शेती पण प्रामुख्याने करावी, जसे आवळा, हर्र, बहेडा, सुंठ म्हणजे आलं, काळी मीरी, पिपरी, लसूण, लिंबू, ओवा, मेथी, ब्राह्मी, शंखपुष्पी, नागरमोथा, कोरफड इत्यादि झाडे प्रामुख्याने लावावी. ज्यांची शेती नाही, त्यांनी आपल्या गॅलरी किंवा अंगणामध्ये कुंडीत तुळस, लिंब, ओवा इत्यादी औषधीय झाडे लावावी, कारण या वृक्षांमुळे असाध्य आजारांचा उपचार संभव आहे. यांच सोबत चोवीस तांसामध्ये एक तास परमात्म्याचं स्मरण करावे आणि कामात असतांना सुद्धा परमात्म्याची आठवण असू द्यावी, जेणे करून संकटाच्या वेळी, तुम्हाला होणारा त्रास सहन करण्याची तुम्हाला शक्ति लाभेल.