डांभुर्णीत दारुच्या नशेत हाणामारीत तान्या बारेलाचा मृत्यू.

Featured जळगाव
Share This:

डांभुर्णीत दारुच्या नशेत हाणामारीत तान्या बारेलाचा मृत्यू.

यावल दि.9( सुरेश पाटील) : तालुक्यातील डांभुर्णी येथील आदीवाशी पावरा वस्तीत रहीवाशी असलेले तान्या लोटन बारेला वय ५०वर्ष व त्याचा आतेभाऊ अखिलेश बळीराम बारेला वय ३६वर्ष यांच्यात घरगुती बोलचाल झाली असता त्याचे रुपांतर वादात झाले व संशयित आरोपी अखिलेश बळीराम बारेला राहणार पिपल झपा एम.पी  याने लाकडी दाडुक्याचा वापर करुन तान्या लोटन बारेला याला मारहाण केली असता तो मृत झाला.ही घटना आज दि.९रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली .या घटनेची माहीती पोलिस  पाटील यांनी पोलिसांना कळवताच यावल पोलीस  स्टेशनचे पो.नि.सुधीर पाटील यांचे मार्गदर्शना खाली पी आय जितेंद्र खैरनार ए.एस.आय विजय पाचपोळे व त्यांचे सहकारी गणेश ढाकणे,सतीष भोई,विजय परदेशी,हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन तान्या बारेलाचा मृतदेह पीएम साठी रूग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास करतांना संशयीत आरोपी अखीलेश बारेला यास दारुच्या नशेत घरातुन पकडून यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तान्या बारेला हा रोजनदारी करुन आपला ऊदरनिर्वाह भागवत होता याचे पश्चात पत्नी,मुलगा१,मुली पाच व पाच जावाई असा परीवार आहे.याची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता निघेल.

मयत तान्या लोटनबारेला

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *