“ जेआयटी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे ” चे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी विशेष श्रम संस्कार शिबीर उत्साहात संपन्न
नाशिक (तेज़ समाचार प्रतिनिधि):सावित्रीबाई फुले पुणे विद्यापी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि जेआयटी अभियांत्रीकी महाविदयालय यांच्या सयुंक्त विद्यमानाने रासेयो हिवाळी श्रमसंस्कार विशेष शिबीर सावरगाव येथे सलग तीन वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे .राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण भागाला वरदान ठरत असून,यातून ग्रामीण भागात रोसेयो स्वयंसेवकाच्या मदतीने विविध विषयांवर जनजाती, श्रमदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्राण विकासाला चालना मिळते असे प्रपादन सरपंच गणपतराव जगताप यांनी केले.सावित्रीबाई फु पुणे विद्यापीठ आणि ‘जेआयटी‘ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सात दिवसीय रासेयो शिबिर १४ फेब्रुवारी २०२० २० फेब्रुवारी २०२०, गंगावर्हे ता.नाशिक येथे उत्साहात संपन्न झाले.शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.व्हि.भटकर, उपसरपंच गणपतराव जगताप ,ग्रामसेवक संजय वाबडे,पोलीस पाटील,सर्व विभाग प्रमुख, प्रा.समाधान पाटील उपस्थित होते. माजी रासेयो स्वयंसेवक लखन सावंत यांनी रासेयो शिबिराला भेट देवून मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले कि स्वयंसेवकांना आपले विचार मांडून आपल्यातील कौश्यल्य दाखवता येते. याचबरोबर आपल्यातील गरजा ओळखून आपल्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांची जान होऊन त्या पूर्ण करण्याची संधी मिळते असे मत व्यक्त कले.रोसेयो समन्वयक प्रा. पंकज बडगुजर यांनी सात दिवसात शिबिराअंतर्गत पार पडलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यात प्रामुख्याने ग्रामस्वच्छता,सांडपाण्यासाठी शोशखड्यांची निर्मिती,हगणदा मुक्त गाव निर्मिती साठी ग्रामसेवक संजय वाबळे ,सरपंच,उपसरपंच व रासेयो स्वयंसेवक यांच्या सहयोगाने गुड मोर्निग पथकाचे आयोजन करण्यात आले आणि ग्रामस्थांना शौचालयाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. विविध विषयांवर गावऱ्यामध्ये जनजागृती,व्याख्यान,शालेय विद्यार्थ्यांसाठी संगणक कार्यशाळा, नोटबंदी आणि “गो–कॅशलेस” या विषयावर प्रबोधन करण्यात आले . शिबिराअंतर्गत पार पडलेल्या उक्रमात प्राचार्य डॉ.एम.व्हि.भकर,रोसेयो समन्वयक प्रा.पंकज बडगुजर व सर्व विभाग प्रमुख प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून गणेश गायकर आणि प्रकाश वाघ यांनी काम पाहिले.शिबीर यशस्वी पार पडण्यास सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
Continue Reading