स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार (वैभव करवंदकर ). नंदुरबार येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद हायस्कूल व प्रार्थमिक शाळा मध्ये युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाब रामदास महाजन, संस्थेचे सचिव देवेंद्र भाऊ भरत माळी सौ.सुनंदा अविनाश पाटील यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाब रामदास महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना विवेकानंदां सारखे प्रज्ञावान, गुणवान ,शीलवान व एकाग्र होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विजय माळी सरांनी सर्व उपस्थितांना हरितक्रांती शपथ दिली. इयत्ता नववीचा विद्यार्थी पवन माळी याने स्वामी विवेकानंदांच्या वेशात “मी विवेकानंद बोलतोय ” या एक पात्री नाटिकेतून विवेकानंदांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर प्रस्तूत केले .

त्यानिमित्त स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा करण्यात आला. त्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्या अंतर्गत सप्ताह सांगता कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गुलाब रामदास महाजन, संस्थेचे सचिव देवेंद्र भाऊ भरत माळी सौ.सुनंदा अविनाश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. तसेच याप्रसंगी महात्मा फुले ब्रिगेड तर्फे दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना महात्मा फुले ब्रिगेड तर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. महात्मा फुले ब्रिगेड चे अध्यक्ष अविनाश भाऊ पाटील ब्रिगेड च्या महिला अध्यक्ष सौ. सुनंदा पाटील ,मच्छिंद्र भाऊ माळी ,अविनाश भाऊ महाजन , भाग्येश पाटील व कार्यकर्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री दादासाहेब गुलाब रामदास महाजन व सचिव देवेंद्रभाऊ भरत माळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक एन. जी.भावसार यांनी विवेकानंदांची भूमिका साकारणाऱ्या पवन प्रकाश माळी याचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी या शाळेतील इयत्ता नववी व दहावी चे विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कुमार माळी यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार निंबा माळी सर यांनी मानले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *