चुंचाळे येथे स्वॅब तपासणीत आढळले 11 पॉझिटिव्ह रुग्ण

Featured जळगाव
Share This:
  • – यावल तहसिलदार जितेंद्र कुंवर यांची शिबीराला भेट

यावल ( सुरेश पाटील) तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या चुंचाळे या गांवात कोविड-१९ साठी रॅपिड एंटीजन व आरटीपीसीआर टेस्ट साठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करून स्वॅब घेण्यात आले. यात दिनांक १४ रोजी ५ तर दिनांक १६ रोजी ६ अश्या एकुण ११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

ग्रामीण भागात कोविंड 19 विषाणूचा वाढता प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी व मृत्यू दर कमी करणे, रुग्णाला पहिल्या पायरीवर ओळखणे , रुग्णाचे लवकर निदान होऊन तो वाचावा व तो लवकर विलगीकरण झाला तर इतर आजूबाजूचे १५व्यक्ती तो संक्रमित होण्यापासून वाचवतो. या अनुषंगाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यात गांवातील व्यवसायिक व्यक्ती,खाजगी डॉक्टरांकडून मिळालेले संशयित रुग्ण, तसेच comorbid-प्रतिकारशक्ती कमी असलेले अशा सर्व व्यक्तींचे ता.आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व साकळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वॅब घेण्यात आले आहे.

सदर स्वॅब वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील,आरोग्य सेविका मालती चौधरी,आरोग्य सेवक संजय अहिरराव,मकरद निकुंभ,सलाऊद्दीन शेख,संदीप शिदे,आशा वर्कर जयश्री चौधरी,सुनयना राजपूत,सलमा तडवी
शिबीर यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील,सरपंचपती संजय पाटील,पत्रकार प्रकाश चौधरी,जि.प.शिक्षक राजु सोनवणे यांनी गांवात जनजागृती करून शिबिरात सहकार्य केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *