सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… पोलिसांचा कडक इशारा

Featured मुंबई
Share This:

सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर…  पोलिसांचा कडक इशारा

 

मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या गळ्याला दोर असलेले फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्याच्या कुटुंबियांना तसंच फॅन्सना आधीच जबर धक्का बसलाय. असे फोटो व्हायरल करण्याला त्याच्या कुटंबियांनी आणि त्याच्या फॅन्सनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी देखील महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

सुशांतचे आत्महत्या केलेले फोटो जर कुणी व्हायरल केले, कुठेही शेअर केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र पोलिसांनी दिला आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने हा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने ट्विटमध्ये म्हटलंय, “सोशल मीडियावर एक चिंताजनक ट्रेंड होतोय. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. असे फोटो पसरवणं हे कायद्याला धरून नाही. न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहे. जर कुणी असे फोटो शेअर केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”

दुसरीकडे सुशांतने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे पूर्ण बॉलिवूड जगतामध्ये सन्नाटा पसरला आहे. यशाच्या शिखरावर असताना असं काय झालं की सुशांतने इतकं टोकाचं पाऊलं उचललं? याबद्दल सगळेच अनभिज्ञ आहेत.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *