
“सुशांतला हाॅटेलमध्ये दिसलं होत भूत…” रिया चक्रवर्ती
“सुशांतला हाॅटेलमध्ये दिसलं होत भूत…” रिया चक्रवर्ती
मुंबई (तेज समाचार डेस्क) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास नव्या वळणावर जाऊन पोहचला आहे मुंबई अन् बिहार पोलिसांकडून करण्यात येत असलेला तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. सीबीआयकडून सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरूच आहे. मात्र याआधी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात रियानं सुशांतच्या आयुष्याबद्धल एक धक्कादायक खुलासा केला आहे. रिया म्हणाली की, सुशांत, मी अन् माझा भाऊ शोविक असे आम्ही तिघे मिळून 2019 मध्ये युरोप टूरला गेलो होतो. या टूरमध्ये इटलीतील फ्लाॅरेन्स शहरातील एका 600 वर्ष जुन्या हाॅटेलात आम्ही थांबलो होतो. या हाॅटेलात मी अन् शोविक एका रूममध्ये तर सुशांत एका स्वतंत्र रुममध्ये होता. यादरम्यान काही कामानिमित्त मी अन् शोविक हाॅटेलमधून बाहेर पडलो होतो. काही तासात आम्ही हाॅटेलात परतलो. मात्र सुशांत हाॅटेलच्या एका कोपऱ्यात बसून रूद्राक्ष माळेचा जप करत होता. सुशांत खुप घाबरला होता. त्याचं शरीर थरथरत कापत होतं. मी आणि शौविक ने सुशांतला हाॅटेलमधल्या रुममध्ये नेले आणि त्याची अशी अवस्था का झाली याबाबत विचारलं. तेव्हा सुशांतने एक धक्कादायक घटना सांगितली.
सुशांतनं हाॅटेलमधील गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराची पेंटींग पाहिली होती. या पेंटींगमध्ये एक राक्षस एका मुलाला खात असल्याचे चित्र रेखाटण्यात आले होते. सुशांत या पेंटींगला पाहून प्रचंड भेदरला होता. तो राक्षस त्याला बोलावत असल्याचं सुशांतनं आम्हाला सांगितलं. मात्र सुशांतची तब्येत अचानक बिघडू लागल्यानं आम्ही पुन्हा मुंबईला परतलो, असा खुलासा रियानं चौकशी दरम्यान केल्याची माहिती आहे.