शिरपूर तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरळीत करावा-क्षत्रिय शिवराणा कृषी मंडळाची निवेदनाद्वारे मागणी
शिरपूर तालुक्यात युरिया खताचा पुरवठा सुरळीत करावा-क्षत्रिय शिवराणा कृषी मंडळाची निवेदनाद्वारे मागणी
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): शिरपूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर युरिया खताचा साठयाची तपासणी करून साठा नसेल तर संबंधित विभागाकडे मागणी करून झालेला खताचा तुटवडा सुरळीत करण्याची मागणी शिरपूर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे क्षत्रिय शिवराणा कृषी विज्ञान मंडळ व बहुउद्देशिय संस्था,आढे 【ता.शिरपूर】 यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
तालुक्यातील उन्हाळी व खरीप हंगामातील बागायती पिकांना रासायनिक खतांचा पहिला हप्ता देण्याचे काम शेतकरी बांधवांनी सध्या पावसाने विश्रांती दिल्याने सुरु केले आहे.यंदा शेतकऱ्यांकडील रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांची कोविड-१९ मुळे आपल्या मालाची बाजारपेठेत विक्री करता आली नाही.यामुळे खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा सुरुवातीला पैशाअभावी साठा शेतकरी बांधवाना करता आला नाही.आता आर्थिक नियोजन करून खताची खरेदी करण्यासाठी शेतकरी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर चकरा मारत आहेत.पंरतु युरिया खत शिल्लक नसल्याचे कृषी केंद्र चालकाकडून सांगण्यात येत आहे.
यासाठी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर युरिया वगळता सर्व प्रकारची रासायनिक खते उपलब्ध आहेत.युरियाशिवाय इतर खते पिकांना देता येत नाहीत.याकरिता आपण आपल्या विभागामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करून युरिया खत नसेल तर संबंधित विभागाकडे मागणी करून खताचा पुरवठा सुरळीत करावा.अन्यथा वेळेत रासायनिक खतांचा पहिला हप्ता पिकांना मिळाला नाहीतर पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.