
लामकानी गावात शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
धुळे (विजय डोंगरे ): लामकानी गावात स्वत: चे शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
लामकानी गावात तोताराम फकिरा चौधरी यांचे स्वत:चे शेतात दुपारच्या वेळी शेतीतील कामे आटोपल्यावर त्यांनी विषारी औषध प्राशन केले व ते तिथेच जवळ जमिनीवर कोसळले.शेतात काही अंतरावरून तोताराम चौधरी यांना खाली पडलेले पाहताच.ते त्यांच्या जवळ शेतातून पळत आले.त्यांना छातीत दुखत असल्यामुळे तातडीने नागरीकांच्या मदतीने धुळे येथील चक्करबर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारार्थ रुग्णवाहिकेतून भरती केले.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला.त्यांनी कर्जबाजारीपणामुळे हे पाऊल उचलले अशी चर्चा सुरू होती.
लामकानी गावात हि वार्ता कळताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील तपास पोलिस करत आहे.