
जामनेरातील आठ लाखाच्या चोरीचा छडा लावण्यात यश
मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात
जामनेर :- शहरातील गिरीजा कॉलनी मधील रहीवाशी बळीराम जयराम माळी यांच्या घरातुन ८ मे रोजी मध्यरात्री सुमारे ८ लाख रूपयांची चोरी झाली होती.त्या चोरीचा छडा लावण्यात पोलीस अधीक्षकांच्या अख्त्यारीत असलेल्या स्थानीक गुन्हे शाखेतील पोकॉ.विजय पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीला अखेर यश येऊन चोरीतील २ लाख ३३ हजाराची रोकड तर ६९ ग्रॅम सोने (बाजारभाव किंमत सुमारे सव्वातीन लाख) असा एकुण पाचलाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली.तर अन्य दोघे फरार आहेत.


चोरी झाल्यापासुनच स्थानीक गुन्हे शाखेकडुन व स्थानीक पोलीसांनी गुप्तपणे तपास सुरूच ठेवला होता.अखेर आज (२५) मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील गांधी चौकात सापळा रचुन सय्यद मुयोदीन सय्यद मुकमोद्दीन रा जुनाबोदवड रोड जामनेर व आकाश उर्फ चांम्पीयन श्याम ईंगळे रा आठवडे बाजार तालुका पोलीसस्टेशनजवळ भुसावळ अशा दोघा आरोपींना अटक करण्यात आली तर अन्य दोन आरोपी वसीम अहमद पिंजारी,जितु (पुर्ण नाव नाही) दोघे रा भुसावळ हे फरार आहेत.
यावेळी पथकामधे सहायक फौजदार अशोक महाजन, गोपनीय शाखेचे ,हेकॉ सुनील दामोदरे, विजय पाटील,रवींद्र घुगे,नंदलाल पाटील,भगवान पाटील आदींचा समावेश होता.