विद्यार्थ्यांना परत मिळणार परीक्षा फी ! विद्यापीठाचा निर्णय

Featured देश
Share This:

सोलापूर (तेज समाचार डेस्क):  कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य सरकारने विद्यापीठांमधील प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द (First year exams cancelled) केल्या. परीक्षा (exams) न झाल्याने शुल्क (Fees) परत मिळावे, अशी मागणी झाली. त्याअनुषंगाने आता प्रथम वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शंभर रूपयातील 19.26 रूपयांचे परीक्षा शुल्क (examination fees) परत दिले जाणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अंदाजित 15 हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क रोखीने मिळेल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. विकास कदम यांनी दिली. (Students of solapur university will get their examination fees refunded)

राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित साडेपाच हजार महाविद्यालये असून त्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 101 महाविद्यालयांचाही समावेश आहे. दरम्यान, परीक्षा शुल्क माफीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सर्वच महाविद्यालयांकडून मागविण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून अभ्यासक्रमनिहाय याद्या तयार केल्या जात असून संबंधित महाविद्यालयांना त्या विद्यार्थ्यांचे शुल्क पाठविले जाणार आहे. त्यामध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी, अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी, बीसीए, लॉ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना किमान 100 ते 233 रूपयांपर्यंत परीक्षा फी देण्यासंदर्भात सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची सभा पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचेही डॉ. कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रथम वर्षाच्या परीक्षा न घेता त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात सरसकट प्रवेश देण्यात आला. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शंभर रूपयातील 19.26 रूपयांप्रमाणे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ठळक बाबी

– जूनअखेर सर्व विद्यार्थ्यांना रोखीने मिळणार परीक्षा शुल्काची रक्‍कम

– परीक्षा शुल्कातील किमान शंभर ते 233 रूपये विद्यार्थ्यांना परत मिळणार

– परीक्षेचा अर्ज न केलेल्या, अंतर्गत मूल्यमापन चाचणीस गैरहजर असलेल्यांना शुल्क मिळणार नाही

– महाविद्यालयांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती घेऊन तयार केल्या जाताहेत याद्या

– महाविद्यालये बंद असल्याने प्रवेश शुल्कातही 50 टक्‍क्‍यांची दिली जाणार सवलत

(Students of solapur university will get their examination fees refunded)

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *