
विद्यार्थ्यांना नातेसंबंध यांच्या जात प्रमाणपत्राचा आधारावर आरक्षण प्रवेश द्यावा : भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी
विद्यार्थ्यांना नातेसंबंध यांच्या जात प्रमाणपत्राचा आधारावर आरक्षण प्रवेश द्यावा : भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी
मुख्यमंत्री ना. ठाकरे, शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांचाकडे मागणी
शिरपूर ( मनोज भावसार ) : जुन महिना सुरु असल्याने विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाचे लागले आहेत. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच शासकिय आणि प्रशासकिय यंत्रणा आरोग्य लढयामध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असे अनेक प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे सध्या शासकिय कार्यालयातुन मिळणे पुर्णपणे बंद झाले आहे. म्हणुन विद्यार्थ्यांना जात नातेसंबंध यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर आरक्षण प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकारे, शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांचाकडे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे कि विद्यार्थ्यांच्या जात व उत्पन्नचा दाखला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
