
लंडन मध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले
पुणे (तेज समाचार डेस्क). लॉकडाउनमुळे काही दिवसांपासून युनायटेड किंग्डम (लंडन) मध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी अखेर मायदेशी परतले. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरुनानी यांनी केलेल्या तत्पर प्रयत्नांमुळे आम्ही मायदेशी परंतु शकलो अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
गिरीश गुरनानी म्हणाले गौरांग तांदुलवडकर (महाराष्ट्र), यश साली (महाराष्ट्र), रिषभ सरसुनिया (दिल्ली), आयुष भुतानी (राजस्थान), नवदीप जंगीर (राजस्थान), यशा पालनकर (महाराष्ट्र) या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. यातील तीन जण पुण्यातील आहेत.
युनायटेड किंग्डम (लंडन) येथे अडकलेल्या पाच विद्यार्थयांनी मला फेसबुकद्वारे संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली. त्वरित ट्वीटरद्वारे सुप्रिया सुळे आणि धीरज शर्मा यांना ही माहिती कळवली. सुप्रिया सुळे यांनी त्वरित इंडियन हाय कमिशनद्वारा संपर्क साधून या बांधवांची मायदेशी परतण्याची सोय केली. या सर्व मोहिमेत भारत सरकार, महाराष्ट्र शासन, भारतीय हाय कमिशन इंग्लंड, सुप्रिया सुळे, धीरज शर्मा यांचे सहकार्य मोलाचे होते, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरुनानी यांनी दिली.
मी स्थलांतराचा अर्ज भरून देखील कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. दोन महिन्यांपूर्वी माझ्या व्हिसाची मुदत संपत आली होती. मी परतीच्या प्रवासाच्या सोयीसाठी खूप प्रयत्न केले. दोन महिन्यांपासून इंडियन एम्बसीकडून ‘आम्ही प्रयत्नात आहोत’ इतकेच उत्तर मिळत होते. तीन -चार फ्लाईटस येथून गेल्या परंतु यादीत माझे नाव येतच नव्हते. माझी नोकरी गेली, जवळचे पैसे संपले होते. यादरम्यान मी गिरीश गुरनानी यांची फेसबुकवरील पुण्यातील काही विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबतची पोस्ट वाचली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. गुरनानींनी खासदार सुप्रिया सुळे, धीरज शर्मा यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे माझे नाव स्थलांतरित यात्रेकरूंच्या यादीत आले आहे, याचा मला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया यशा पालनकर यांनी व्यक्त केली.