तणावमुक्त जीवन आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता !

Featured जळगाव
Share This:

 

तणावमुक्त जीवन आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता !

यावल (सुरेश पाटील):सध्याच्या प्रतिकूल काळात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पवित्र अशा हिंदू धर्माचे शिक्षण घेऊन धर्माचरण करण्याचे महत्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती द्वारा विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात ‘ताण-तणाव मुक्त जीवनासाठी धर्मशिक्षणाचे महत्व’ या विषयावर सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था तसेच ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिन्दु जनजागृती समिती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
‘ऑनलाईन’ व्याख्यान सोमवारी, 31 मे ला सायंकाळी 6 वाजता असणार असून यात Youtube द्वारे सहभागी होता येईल.

यासाठी Youtube लिंक: https://youtu.be/8tbDmAoaMG8

‘ऑनलाईन’ होणाऱ्या या व्याख्यानाला अधिकाधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहभागी व्हावे व तसेच यासंदर्भात 9552426439 या क्रमांकाशी संपर्क करूयात असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *