मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन

Featured धुळे
Share This:

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन

 शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा. मुख्य अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यातआले. निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दैनिय झालेली असून आपल्या प्रशासनाची याकडे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही . या पुलाजवळ ब.ना.कुमार गुरुजी हायस्कूल असून शहादा , बोराडी व गावातील जनतेच्या वहातूकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे . त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . असे असतांना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू ठरु शकेल असे मोठ मोठे व खोल खड्डे निर्माण झालेले आहेत . अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली असून प्रशासनाचे डोळेझाक व दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे . या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे . तरी या रस्त्यांचे काम पुढील १५ दिवसांच्या आत करावे . असे समस्त वाघाडी ग्रामस्थांचे म्हणने आहे . व यास्तव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपणास निवेदानाव्दारे सुचित करीत असून रस्त्यांचे काम सुरु न केल्यास मनसे मार्फत तिव्र आंदोलन छेडन्यात येईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे , मनविसे शिरपुर ता.संघटक कैलास बाबर , मनविसे शहर अध्यक्ष सोनु राजपुत , मनविसे शिरपुर शहर उपाध्यक्ष राज भोई , मनसे शिरपुर शहर उपाध्यक्ष मुकेश माळी , अजय राजपुत , रमेश भिल , ज्ञानेश्वर भिल प्रथमेश चौधरी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *