भाजपा नंदुरबार तर्फे अधिक्षक अभियंता महावितरण प्र.विभाग, नंदुरबार यांना निवेदन

Featured नंदुरबार
Share This:

भाजपा नंदुरबार तर्फे अधिक्षक अभियंता महावितरण प्र.विभाग, नंदुरबार यांना निवेदन

नंदुरबार ( वैभव करवंदकर): जागतिक महामारी कोरोनामुळे आपल्या देशात 22 मार्च 2020 पासुन लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना या लॉकडाऊनमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. लोकांना 3 महिन्यांपासुन रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला आहे असे असुण त्यांचे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत आहे. अश्या परीस्थितीत विज वितरण कंपनी ग्राहकांना या 3 महिन्याचे अंदाजित बिल आकारणी करुन त्यांच्यावर मोठा आर्थिक बोझा लादते आहे.
भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा या निवदेनाव्दारे राज्य सरकारला विनंती करु इच्छिते की, कोरोना ही जागतिक महामारी लक्षात घेता सर्वसामान्य विज ग्राहकांना त्यांच्या या 3 महिन्यांच्या कालावधीतील विजबिल माफ करण्यात यावे. तसेच कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय अडचणित आले आहे. तर कित्येकांना आपलया नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. सर्व सामान्य नागरीक प्रचंड आर्थिक अडचणित आहे. अश्या परीस्थितीत अवास्तव विज आकारणी केली जात आहे. हे सर्वस्व चुकीचे आहे ग्राहकांची सर्व सामान्य नागरीकांची विजवितरण कंपनीने पिळवणुक थांबवावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी जिल्हा तर्फे नंदुरबार जिल्हयात तीव्र आदोंलन छेडण्यात येईल असे या निवेदनात म्हटले. निवेदन देतांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आकाश चौधरी आदि.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *