
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ) :आज दि.28 ऑक्टोंबर 2020 रोजी आ.कोळी समाज समन्वय समिती तर्फे शासना कडून राबविण्यात येणारी खावटी योजना संदर्भात निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले शासनाने खावटी योजना राबवित असतांना शोषित पीडित अंध,अपंग,विधवा,अल्पभूधारक ,हातमजुर यांना कोरोना महामारी संकटामुळे आर्थिक अडचणींवर मात करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचीत जमाती साठी ही योजना राबवित असतांना शासनाकडून कुठलीच कागदपत्रे आवश्यकता नसूनही ग्रामसेवक,रेशनकार्ड, आधारकार्ड,किंव्हा 2011 आर्थिक जनगणना चा सर्व्हे ग्राह्य धरत नसून जातीचा दाखला,किंव्हा व्हॅलीडीटी प्रमाण पत्र असल्या शिवाय ही योजना तुम्हाला लागू होत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन ,या योजनेला टोकरेकोळी,ढोरकोळी, महादेवकोळी,डोंगरकोळी,ठाकूर ,मल्हार या जमाती पात्र नाही शासनाने काढलेले gr चा अभ्यास न करता फक्त 2 ते 3 जमाती चा सर्वे राजकारणी च्या दबावाखाली अधिकारी काम करत आहे.आपल्या स्तरावरुन संबधित अधिकारी यांना समज देऊन अडवणूक थांबवावी व जाचक अटी पासून मुक्त करून खावटी योजना पात्र असलेले गरीब होतकरू यांना खावटी योजनेचा लाभ मिळावा या मागणी साठी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती कडुन निवेदन देण्यात आले
निवेदन देण्यासाठी आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे
श्री.रविभाऊ शिरसाठ
खांदेश विभाग उपाध्यक्ष,
श्री.गिरधर आप्पा महाले
राज्य कार्यकारीणी सदस्य
श्री.दिलीप बापु बागुल
खांदेश विभाग कार्याध्यक्ष
श्री.हिरालाल भाऊ वाकडे
धुळे जिल्हा अध्यक्ष
सौ.अँड् शोभाताई खैरनार
जिल्हा समन्वयक महिला आघाडी
सौ.कल्पनाताई बोरसे
जिल्हा अध्यक्षा व माजी सभापती पंचायत समिती शिरपूर
सौ.सोनालीताई अखडमल
जिल्हा उपाध्यक्षा,
श्री.साहेबराव कोळी
जिल्हा सल्लागार,
श्री.देवीदास नवसारे
तालुका अध्यक्ष
श्री.संदिप येळवे
शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष
श्री.दादासाहेब येळवे
शिंदखेडा तालुका युवा उपाध्यक्ष
श्री.राज कोळी
धुळे शहर प्रमुख
श्री.दिलीप शिरसाठ
जिल्हा सहसचिव
चि.हेमराज तुकाराम जाधव
युवा नेता
श्री.राहुल सैंदाणे
सामाजिक कार्यकर्ते
संकलन
श्री.हिरालाल वाकडे
अध्यक्ष धुळे जिल्हा
आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य