
धुळ्यात मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न
धुळ्यात मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे येथे मराठा पाटील समाज वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन सैनिक लॉन येथे करण्यात आले होते राज्यस्तरीय मेळाव्यात सातशे वधू-वरांच्या सूची पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले व वधू-वर पालक परिचय मेळाव्यात 7 45 वधू-वरांनी आपला परिचय दिला.
या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्राचार्य वि के भदाणे यांनी केले. यावेळी सोबत व्यासपीठावर संतोष सुर्यवंशी अध्यक्षस्थानी अॅड. रमेश पाटील डॉक्टर दिलीप पाटील प्राध्यापक शरद पाटील अॅड. जे टी देसले डॉक्टर अरुणराव साळुंखे सुरेंद्र मराठे उपस्थित होते.परिचय मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते सातशे वधू-वरांच्या सूची पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संतोष सुर्यवंशी हे उत्कृष्ट कार्य करतात यानिमित्ताने महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
वधू-वर पालक परिचय मेळावा ही काळाची गरज झाली आहे समाजाच्या हिताच्या दृष्टीने मुलींची स्थळे जुळावी व मुलीच्या पाल्यांना खर्च कमी लागावा अनिष्ट रूढी परंपरा साखरपुडा हुंडा गोंड मंगळ उंची शिक्षण याबाबत विशेष उपयुक्त व शेतकरी व्यवसायिकांना मुली द्या.व घटस्फोटीत विधवा मुलींना त्यांच्या पालकांसह स्वीकारा असे भावनिक आवाहन संतोष सुर्यवंशी यांनी केले. उपस्थितांचे आभार मानले.
यानंतर 475 वधू-वरांनी आपला परिचय दिला. मोठ्या संख्येने समाज बांधव या वेळी उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी रंगराव पाटील एस के पाटील वाळके पाटील सरोज बाविस्कर सुमित पाटील दिनेश सूर्यवंशी एन आर पाटील सुभाष सूर्यवंशी इंदिरा पाटील सुनिता पाटील आदींनी परिश्रम घेतले.