शिरपूर तालुक्यातील रिक्षा चालक, मालकांना कर्नाटक सरकार प्रमाणे राज्य सरकारने आर्थिक मदत करावी : मागणी

Featured धुळे
Share This:
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील सिटीरिक्षा चालक, मालक यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणीचे निवेदन तहसिलदार आबा महाजन यांना तहसिल कार्यालय शिरपूर येथे युनियनचे पदाधिकार्‍यांनी दिले आहे. निवेदनाची प्रत आ. काशिराम पावरा यांना हि देण्यात आली आहे.

निवेदनावर युनियन अध्यक्ष दत्तु माळी, उपाध्यक्ष भानुदास ईशी, सचिव अजय बैंसाणे, सदस्य मोहन येशी, चंद्रकांत चौधरी, प्रकाश चौधरी, गोपाल माळी आदिंच्या सह्या आहेत. निवेदनात तालुक्यात युनियनचे एकुण ४०० सदस्य आहेत. कोरोना या जागतिक महामारीमुळे सर्वांचे खुपच नुकसान झाले आहे देशात अडीच महिन्यापासुन लाॅकडाऊन असल्यामुळे तालुक्यात रिक्षा व्यवसाय ठप्प झालेला आहे. तरी आमचा उदरनिर्वाह हा रिक्षावरच अवलंबुन असल्यामुळे आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. म्हणुन आम्हाला शासनाने आर्थिक मदत व किराणा किट देण्यात यावी तसेच दिल्ली व कर्नाटक सरकारने मुख्यमंत्री निधीतुन रिक्षा चालक व मालक यांना रुपये ५०००/ (पाच हजार मात्र) मदत दिली आहे त%8

Share This: