
एसटी प्रवासाच्या संदर्भातील चुकीची माहिती, परिवहन मंत्री अनिल परब यांची करा तात्काळ हकालपट्टी
मुंबई (तेज समाचार प्रतिनिधी ): एसटी प्रवासाच्या संदर्भातील चुकीची माहिती देऊन कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवल्याचा हलगर्जीपणा केल्याबद्दल आणि बेजबाबदरपणे वागल्या बद्दल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी मान. मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
त्यांच्या या घोषणेमुळे गेले दोन महीने अडकलेले विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर जे त्यांच्या इच्छित स्थानी जाण्याच्या प्रतीक्षेत होते त्यांची विविध ठिकाणच्या एसटी स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली. हजारोंचा जमाव एसटी स्थानकावर जमला व त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ही पाळले गेले नाही. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतक्या बेजबाबदारपणे वागणाऱ्या परिवहन मंत्र्यांना कार्यमुक्त करण्याशिवाय पर्याय नाही.
आता मात्र एसटीने प्रवास करता येणार नाही असा हेकेखोर निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला. हा निर्णय तातडीने बदलावा व या सर्व लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी आणि जे खासगी वाहनाने प्रवास करू इच्छित आहेत त्यांना शासनाने परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी ही आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.