
शिरपूर ब्रेकिंग : त्या एसआरपी जवानाची पत्नी व मुलगी पण पॉजिटिव
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). मालेगाव येथे ड्यूटीवर असलेल्या धुळेच्या एसआरपी जवानाला कोरोनाची लागण झाली आसून त्याच्या पत्नी व मुलीचा कोरोना रिपॉर्ट पर आज पॉजिटिव आला आहे. याबाबत पोलीस यंत्रणेसह प्रशासन अर्थे गावात दाखल झाले असुन संपूर्ण गांव सिल करण्यात आले आहे.
दो दिवसापूर्वी धुळेचा एसआरपीचा एक जवान आपल्या बायको आणि मुलीला आपल्या गावी म्हणजेच अर्थे येथे सोडण्यासाठी आला होता. या जवानाची ड्यूटी मालेगाव येथे लागली होती, म्हणुन त्याची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ह्या जवानाची कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आल्या नंतर त्याला उपचारासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या नंतर त्याचा बायको व मुलीची पर कोरोना तपासणी करण्यात आली. आज त्या दोघांची रिपोर्ट आल्या नंतर ते दोघेही कोरोना पॉजिटिव आढल्याची माहीती येत आहे. ही बातमी मिळताच पोलीस यंत्रणा व प्रशासनाने संपूर्ण अर्थे गांव सिल केले आहे आणि गावातील लोकांना घरातच रहाण्याची ताकीद दिली आहे.