तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी, लघुपाटबंधारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, हरिपुरा धरण साइटवर

Featured जळगाव
Share This:

तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी, लघुपाटबंधारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, हरिपुरा धरण साइटवर

साइटवर भेट दिल्याने तसेच कॉन्ट्रॅक्टर महेंद्र पाटील यांनी अभियंत्यास धमकी दिल्याने जिल्ह्यात ठेकेदाराच्या दबंगगिरीचा चर्चेचा विषय.

यावल (सुरेश पाटील): सातपुडा डोंगराच्या कुशीत यावल तालुक्यात हरीपुरा धरण सांडव्याचे कोट्यवधी रुपयाचे बांधकाम सुरू आहे हे बांधकाम कशा प्रकारे सुरू आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी,लघुपाटबंधारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे,लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता कुलकर्णी मॅडम, तसेच भुसावळ येथील लघुपाटबंधारे बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता नितीनकुमार आढे यांनी सोमवार26एप्रिल 2021 रोजी दुपारी हरिपुरा धरण साइटवर भेट दिल्याने तसेच सांडव्याचे काम करणारे मे चक्रधर कॉन्ट्रॅक्टर्स इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव संचालक महेंद्र पाटील यांनी कनिष्ठ अभियंता आढे यांना धमकी दिल्याचे काय झाले तसेच अधिकाऱ्यांवर दबंगगिरी होत असल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
याबाबत तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता श्रीस्वामी यांना वरील तारखेस व वेळेस प्रत्यक्ष भेटुन ठेकेदाराने त्यांच्या एका कर्मचाऱ्याला तथा कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याबाबत विचारले असता तसे काही झाले नाही असे मुख्य अभियंता श्री स्वामी यांनी उत्तर दिले.
परंतु भुसावळ येथील लघुपाटबंधारे पाटबंधारे बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता नितीनकुमार आढे यांनी महेंद्र पाटील संचालक चक्रधर कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक 5 एप्रिल 2021 सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तुमची बदली करून घ्या व उद्यापासून माझे साइटवर हरिपुरा येथे पाय ठेवू नका अशी धमकी दिली आहे अशी लेखी तक्रार भुसावळ येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग उपविभागीय अभियंता यांच्याकडे करण्यात आली.या पत्रानुसार भुसावळ येथील लघु पाटबंधारे बांधकाम उपविभागीय अभियंता अ.न.तपासे यांनीसुद्धा दि. 7 एप्रिल2021रोजी लघु पाटबंधारे विभाग जळगाव कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र देऊन घटनेसंदर्भात तसेच कंत्राटदाराकडून धमकीची भाषा वापरून दरडावणे बाबत कळविले होते आणि आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली हे गुलदस्त्यात अडकून असले तरी कनिष्ठ अभियंता नितींकुमार आढे यांनी मात्र जळगाव येथील रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दि.7 एप्रिल 2021 रोजी दाखल केला आहे यात सुद्धा जळगाव येथील रामानंद नगर पोलिसांनी काय कार्यवाही केली काय जाबजबाब घेतले हेसुद्धा गुलदस्त्यात अडकून असल्याने तापी पाटबंधारे महामंडळ विभागात काही ठेकेदारांची अशाच प्रकारे दबंगगिरी असल्याचे तसेच पाटबंधारे विभागातील एक निवृत्त अधिकारी आज सुद्धा जळगाव पाटबंधारे विभागात संबंधित अधिकाऱ्यांना राजकारण्यांना ठेकेदारांना मार्गदर्शन करून आपले आर्थिक हित साध्य करून आपले वर्चस्व आणि दबदबा कायम ठेवला आहे.
भुसावळ लघु पाटबंधारे बांधकाम उपविभागीय अभियंता तसेच लघुपाटबंधारे विभाग जळगाव कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रारीनुसार पुढील कार्यवाही काय केली जाते याकडे सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे तसेच पाटबंधारे विभागातील संपूर्ण अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदारांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *