सामाजिक शास्त्र ऑनलाईन उद्बोधन वर्गास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार
Share This:

सामाजिक शास्त्र ऑनलाईन उद्बोधन वर्गास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार (वैभव करवंदकर ): जिल्ह्यातील सामाजिक शास्त्र विषय अध्यापकांसाठी “समाजिक शास्त्र आणि जीवन कौशल्य” या विषयी आयोजित ऑनलाईन उद्बोधक वर्ग 100 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या या उपक्रमाला शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक शास्त्र सीआरजी सदस्य तसेच इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणारे सामाजिक शास्त्र चे विषय शिक्षक यांच्यासाठी दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील शिक्षणशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ .कविता साळुंखे, प्रा. प्रताप पत्रे प्राचार्य मराठा विद्या प्रसारक महाविद्यालय नाशिक, प्रा. डॉ. ज्योती लष्करी, प्राचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय अक्कलकुवा व प्रा. डॉ. अनिता थोरात उपप्राचार्य, अभोणा शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक हे उपस्थित होते. सामाजिक शास्त्रात समाविष्ट असलेले नवे व आधूनिक विचारप्रवाह, सामाजिक शास्त्रात द्यावयाच्या अध्ययन अनुभूती, सामाजिक शास्त्र आणि जीवन कौशल्य शिक्षण, सामाजिक शास्त्रात अध्ययन अनुभूतीसाठी आयसीटी वापर अश्या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आपली मते मांडली. दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे येथील सामाजिक शास्त्र विभागाच्या उपसंचालिका डॉ . कमलादेवी आवटे तसेच डॉ. दत्ता थिटे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. जगराम भटकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाने ही कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. मच्छिंद्र कदम यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून संबंधित विषयांच्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी शाळास्तरावर करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन प्रशिक्षणाच्या शिस्त व नियम याबाबत शिक्षकांना संबोधित केले. संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. रमेश चौधरी यांनी देखील प्रशिक्षणार्थ्यांनी संवाद साधून सामाजिक शास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले. सामाजिक शास्त्र विषय प्रमुख श्री. पंढरीनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अधिव्याख्याता डॉ . वनमाला पवार यांनी तज्ञ मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. सामाजिक शास्त्राचे विषय सहाय्यक श्री. प्रकाश भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेसाठी संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता तसेच विषय सहाय्यक श्री संदीप पाटील, आयटी तज्ञ श्री गोविंद वाडीले या सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेसाठी ग्यानप्रकाश फाउंडेशनने ऑनलाइन झूम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल शिंदे यांनी सहकार्य केले. कार्यशाळेची सदस्य मर्यादा तीनशे शिक्षक असताना सर्व शिक्षक सहभागी झाले, हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले. संबंधित तज्ञांचे व्याख्यान रेकॉर्डिंग करून हे डायट नंदुरबार चैनल वर टाकण्यात येणार असून, सर्वांनी त्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ अधिव्याख्याता श्री प्रवीण चव्हाण यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *