
नंदुरबार : राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत कु. स्नेहल चव्हाण चा गौरव
नंदुरबार (वैभव करवंदकर) राज्यस्तरीय ऑनलाईन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल कुमारी स्नेहल नामदेव चव्हाण हिचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी आणि वेदांत बाल रुग्णालय चाळीसगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. नंदुरबार येतील कुमारी स्नेहल चव्हाण हिने ये वतन….. मेरे वतन… आबाद रहे तू …..हे देशभक्तीपर गीत सादर केले होते. त्याबद्दल तिला सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.