
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर पुन्हा पकडला अवैध गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती
‘गो’ सेवकांची सतर्कता.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर पुन्हा पकडला अवैध गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती.
ग्रामीण भागात पशुधन चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ शेतकऱ्यांच्या तक्रारी परंतु पोलिसांचे दुर्लक्ष.
यावल (सुरेश पाटील): बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला लागून असलेल्या सरळ रेषेत चोपडा,यावल,रावेर तालुक्यातून अनधिकृत अवैध तसेच चोरीचे गोवंश आणि इतर पशुधन अवैध अनाधिकृत वाहतूक करून ठिक- ठिकाणी बेकायदा कत्तल केली जात आहे याचा एक भक्कम पुरावा आणखी ‘गो’सेवकांमुळे पुन्हा आज समोर आला आहे,आज दि.26शनिवार रोजी सकाळी6वाजता यावल चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ ‘गो’सेवकांनी सतर्कता दाखवून अवैध गोवंश वाहतूक करणारा छोटा हत्ती पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने अवैध ‘गो’ वाहतूक करणाऱ्यांमध्ये तसेच कत्तलखाने चालवणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातून बऱ्हाणपूर मार्गे किंवा सातपुड्यातील पाल परिसरातून अनेक रस्त्यांवरून तसेच बऱ्हाणपूर-अंकलेश्वर तथा चोपडा रावेर या महामार्गावरुन लहान मोठ्या वाहनांमधून कंटेनर मध्ये गुरेढोरे कोंबून मारूळ मार्गे गोवंश व इतर पशुधनाची अवैध चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे,गुराढोरांची अनधिकृत विना परवाना कत्तल करणाऱ्या काही चोरट्यांनी,हरामखोरांनी तथा अवैध गुराढोरांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकानी ग्रामीण भागातून ठीक-ठिकाणाहून पशुधन चोरण्यासाठी चोरट्यांची मोठी यंत्रणा उभारली आहे,पशुधन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये चोरी प्रकरणांमध्ये तालुक्यातील बोरावल भालशिव पिंपरी इत्यादी ग्रामीण भागातून प्रत्येक पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुरंढोरं चोरी प्रकरणात वाढ झालेली असून तशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी सुद्धा आहेत परंतु पोलीस कार्यवाही करीत नसल्याने आणि लक्ष केंद्रित करीत नसल्याने चोरट्यांना पोषक वातावरण निर्माण झालेले आहे,पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांना सक्तीचे आदेश काढून संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह यावल,रावेर,चोपडा तालुक्यात पशुधनाच्या चोरट्यावर नियंत्रण आणल्यास किंवा सतत कारवाई सुरू करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर अवैध गोवंश व इतर पशुधनाचे अनधिकृत वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल असे बोलले जात आहे.
यावल तालुक्यात यावल पोलीस स्टेशन पासून5ते6 किलोमीटर अंतरावर वढ़ोदा गावाजवळ आज सकाळी6 वाजता ‘गो’ सेवकांनी छोटा हत्ती टाटा एस कंपनीचे वाहन क्र.MH-04-GC–9661 पकडले असता गोवंशाचे चार नग आढळून आले पकडलेला छोटा हत्ती यावल पोलिसांच्या ताब्यात दिला असून यावल पोलीस पुढील कार्यवाही काय करतात?याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.