
मंडपात एका ठिकाणी बसून वाळू नियंत्रण- कर्तव्य बाबत अनेक प्रश्न उपस्थित, मंडप टाकण्याचे आदेश दिले कोणी?
मंडपात एका ठिकाणी बसून वाळू नियंत्रण.
कर्तव्य बाबत अनेक प्रश्न उपस्थित.
मंडप टाकण्याचे आदेश दिले कोणी?
यावल ( सुरेश पाटील): यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक तस्करी बंद होणेसाठी तालुक्यातील थोरगव्हाण येथिल सर्कल तलाठी यांनी मंडप टाकून एका ठिकाणी बसून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याचे स्वप्न बघितले आहे.तलाठी किंवा सर्कल कार्यालयात बसून किंवा इतर ठिकाणी फिरून अवैध वाळू वाहतुकीस आळा घालता येणार नाही का? किंवा एकट्या थोरगव्हाण परिसरात एका ठिकाणी बसून वाळू वाहतूक बंद होणार आहे का?एका ठिकाणी मंडप टाकून अवैध वाळू वाळू वाहतुकीवर नियंत्रण करा असे आदेश कोणी कोणाला केव्हा दिले आहे याबाबत सुद्धा यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील तापी नदी पात्रातुन रेतीची होणारी अवैध चोरटी वाहतुकीला आळा बसविण्यासाठी यावल तहसिलदार यांनी गस्त पथकांची नियुक्ती केली असल्यामुळे अवैध रेती वाहतुक करणाऱ्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
थोरगव्हाण,पथराडे,शिरागड येथुन तापी नदीच्या पात्रातुन खुलेआम अवैध वाळू वाहतुक बिनधास्त पणे सुरु होती महसुल विभागाकडुन अवैध रेती वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार करुनही अवैध रेती वाहतुक सुरुच होती.तर अवैध रेती वाहतुकीचे टँक्टर पकडण्यासाठी जाणाऱ्या महसुल विभागाचे मनवेल येथील तलाठी स्वप्निल तायडे यांचा अंगावर टँक्टर चालविण्याचा प्रयत्न करुन त्याचा पायाला दुखापत करण्यात आली असल्यामुळे थोरगव्हाण येथील मुख्य चौकात वाळुची चोरटी वाहतुक रोखण्यासाठी तलाठी मुकेश तायडे,कोतवाल धनराज महाजन होमगार्ड कैलास लावणे या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
थोरगव्हाण येथे अवैध वाहतुकीचा आळा बसण्यासाठी गेल्या5ते7 दिवसांपासून तलाठी यांनी मंडप टाकून एका ठिकाणी ठाण मांडून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याचे स्वप्न बघितले आहे यामुळे खरोखरच अवैध वाळू वाहतूक बंद होणार आहे का आणि असे जर असेल तर प्रत्येक सर्कल आणि तलाठी यांनी भरारी पथक का ऐवजी एका ठिकाणी मंडप टाकून अवैध वाळू वाहतूक बंद करावी.तालुक्यात तलाठी सर्कल यांचे शासकीय कामकाजासाठी तलाठी कार्यालय जागा निश्चित केलेले आहेत ही कार्यालय असून सुद्धा अवैध वाळू वाहतूक सुरू होती आणि आहे अवैध वाळू वाहतूक नेमकी कोणाच्या आशीर्वादाने आणि कोण कोणत्या राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली सुरू असून मासिक हप्तेबाजी सुद्धा कोणत्या प्रकारे कोणाकोणाच्या माध्यमातून सुरु आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा महसूल विभागाला एका ठिकाणी मंडप टाकून अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्याबाबतचे कृत्य करावे लागत आहे. याबाबत संबंधितांना आपल्या कर्तव्याची आणि आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
एकट्या थोरगव्हाण गावात फक्त एक मंडप टाकून अवैध वाळू वाहतूक बंद होईल का?आणि असे असेल तर प्रत्येक मंडळात गावागावात अवैध वाळू वाहतुकीचे डांभुर्णी,साकळी,वढोदे,दहिगाव, यावल,सातोद,कोळवद,डोंगरकठोरा अंजाळे,पाडळसे,बामणोद,भालोद. हिंगोणा,हंबर्डी,फैजपूर मारूळ परिसरात जेवढे काही रस्ते आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महसूल विभागाला शेकडो मंडप(पावसाळा वगळता कारण पावसाळ्यात वाळू वाहतूक 75% बंद असते)कायमस्वरूपी टाकावे लागतील.याचा विपरीत परिणाम मुख्य तलाठी कार्यालयातील तलाठी सर्कल यांच्या उपस्थितीवर झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे अवैध वाळू वाहतूकित जी मासिक कोट्यवधी रुपयाची हप्तेबाजी सुरू आहे ती कोणाच्या आशीर्वादाने आणि अवैध वाळू वाहतुकीत कोण कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक कार्यकर्ते सहभागी आहेत आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून हप्ते कोण वसूल करीत आहे याबाबत महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्तिक रित्या नियोजन करून तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकदारांचे नाव वाहन क्रमांकासह माहिती गोळा करून ठोस कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.