प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

Featured
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क).  देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

यासोबतच शिंजो आबे, डॉ. बेली मोनाप्पा हेगडे, नरिंदर सिंग कपानी, मौलाना वाहीदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहू यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसंच यासोबतचं दहा जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह तारलोचन सिंह, महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक, केशूभाई पटेल, नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगोई, कृष्णन नायर यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून या आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दात अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *