जामनेरचे कापूस व्यापाऱ्याकडून मापात पाप

Featured जळगाव
Share This:

जामनेरचे कापूस व्यापाऱ्याकडून मापात पाप

कृषी भूषण पुरस्कार प्राप्त गांवातच शेतकऱ्यांची आर्थिक लूट.

यावल  ( सुरेश पाटील ): तालुक्यात शासनाने सीसीआय केंद्र व कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून भावात लूट करून सुद्धा व्यापाऱ्याचे पोट भरत नसल्याने कापूस मोजतांना कापसाचे व्यापारी वजनात मापात पाप करून शेतकर्‍यांची आर्थिक लूट करीत असल्याची घटना तालुक्यातील भालोद गांवात दोन दिवसांपूर्वी घडली. भालोद गांवातील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त तसेच महाराष्ट्र राज्य स्तरीय कृषी सल्लागार समिती ( आत्मा कमिटी ) सदस्य आणि यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक नारायण बापू चौधरी यांच्याच गांवात शेतकऱ्याचा माल घेताना व्यापाऱ्यांने मापात पाप केल्याने त्यांच्या समोर एक मोठे आव्हान आहे.
यावल तालुक्यातील भालोद येथे एका शेतकऱ्याचा कापूस येथील एका दलालामार्फत जामनेरच्या एका व्यापाऱ्यांला विक्री केलेला होता, जामनेरच्या व्यापाराचा ट्रक भालोद येथे आला व संबंधित शेतकऱ्याचा कापूस मोजणीस सुरवात झाली, घरात पडलेला कापूस शेतीसाठी लागणारा पैसा शासन कापूस खरेदी करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने व्यापार्‍याला द्यावा लागत आहे, त्यातच 40 किलो कापसाच्या मागे 14 किलो कापूस चोरी एका व्यापाऱ्यांनी इलेक्‍ट्रॉनिक काट्याच्या माध्यमातून केल्याची चर्चा गांवात वार्‍यासारखी पसरली त्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी संतप्त झाले , बारा धड्या या व्यापाऱ्यांनी कापसाच्या मोजलेल्या होत्या त्यात प्रत्येक कापसाच्या एका धडी मागे 13 किलो कापूस इलेक्ट्रॉनिक काट्याच्या माध्यमातून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सदरच्या व्यापाऱ्याने कापूस भरताना कोरडा कापूस शेतकऱ्यांकडून घेतला व गाडीमध्ये चक्क पाणी टाकून ओला चिंब कापूस करून त्याची दबाई करीत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सदर कापूस देणे बंद केले व गांवातील काही प्रतिष्ठित यात मध्यस्थी पडल्याने या प्रतिष्ठित व्यक्तींची चमचेगिरी करणारा “दलाल “आपसात समझोता झाला व गाडी येथून परत गेल्याचे सांगण्यात आले काही शेतकरी प्रतिष्ठितांच्या ऐकत असतात मात्र त्यांची स्वतःची झालेले नुकसान याकडे प्रतिष्ठित यांच्या शब्दामुळे त्यांचा हिरमोड होतो प्रतिष्ठित यांनीही आपल्याच शेतकऱ्यांची लूट झाली आहे. तर संबंधित दलाल व व्यापाऱ्याला पाठीशी घालू नये असे भालोद गावातून बोलले जात आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी तालुकाभर चौकशीकामी व कार्यवाहीसाठी फिरत असतात त्यांच्याकडून धान्य खरेदी करणारे व कापूस खरेदी करणारे व्यापाऱ्यांकडून रितसर पावत्या फाडल्या जातात मग त्या व्यापाऱ्याची त्या दिवशी बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने पावती फाडली होती का ? हा प्रश्न उपस्थित होत असून यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने आता तरी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी त्या काही दलाल व व्यापाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची लूट होणार नाही त्यासाठी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी कापूस खरेदी केला जातो त्या व्यापाऱ्याच्या ट्रकचे कापूस भरण्याआधी चे वजन आणि कापूस भरल्यानंतर चे वजन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजनकाट्यावर झाल्यास त्या व्यापाऱ्याने कोणकोणत्या शेतकऱ्याकडून किती कापूस व किती धान्य खरेदी केले आहे याची खात्री होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबेल, तसेच त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याकडून बाजार समिती कर्मचाऱ्याकडून पावती फाडली जाते किंवा नाही याची चौकशी करणे गरजेचे आहे असे तालुक्यात सर्व स्तरातून बोलले जात आहे.
भालोद येथील प्रगतशील शेतकरी नारायण बापू चौधरी यांना राज्य सरकारने कृषिभूषण पुरस्कार दिलेला आहे, तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय कृषी सल्लागार समिती सदस्य म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याच प्रमाणे नारायण बापु यांना यावल कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांनी यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, मका, हरभरा इत्यादी धान्य व कापूस व्यापारी कापूस खरेदी करताना ( कापूस वगळता ) पारदर्शी व्यवहार कसे होतील तसेच तालुक्यातील खेडा खरेदी बंद करून यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांचा माल लिलाव पद्धतीने कसा विक्री करता येईल याबाबत ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्षात कारवाई करावी अशी सुद्धा मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे. जेणे करून कोणताही व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेताना मापात पाप करणार नाही, आणि शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाचा मोबदला योग्य भाव व दरात मिळेल.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *