श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान नंदुरबार जिल्हा भव्य संत संमेलन नंदुरबार व श्री क्षेत्र प्रकाशा येथे उत्साहात संपन्न..!

Featured नंदुरबार
Share This:

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान नंदुरबार जिल्हा भव्य संत संमेलन नंदुरबार व श्री क्षेत्र प्रकाशा येथे उत्साहात संपन्न..!

श्री जितेंद्र महाराज पाडवी, ह.भ.प.खगेंद्र महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी, महंत श्री योगीदत्तनाथ महाराज,यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न.

नंदुरबार  (तेज समाचार प्रतिनिधि) : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर उभारणीसाठी तसेच त्यासाठी निधी संकलन आणि संपर्कासाठी नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार येथे दि ११ जानेवारी २०२१ रोजी तसेच श्रीक्षेत्र प्रकाशा येथे दि १२ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील विविध संत महंत यांच्या उपस्थितीत संत संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनाचे उदघाटन दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली. यावेळी संत संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून खगेंद्र महाराज, ज्ञानेश्वर महाराज माळी, जितू दादा पाडवी (आप की जय परिवार), महंत योगीदत्त महाराज धर्माचार्य प्रमुख, जत्र्या दादा पावरा महाराज( विश्व हिंदू परिषद, जिल्हा प्रमुख), गुलाबसींगदादा वसावे (जिल्हा संघचालक) अजय भाऊ कासार( जिल्हा अभियान प्रमुख) व जिल्ह्यातील विविध सांप्रदायाचे संत महंत उपस्थित होते.नंदुरबार येथील संत संमेलन श्री गजानन महाराज मंदिर येथे तर प्रकाशा येथील संमेलन सद्गुरू धर्मशाळा प्रकाशा येथे पार पडले यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक संत महंत, विविध संप्रदायांचे प्रमुख उपस्थित होते.श्री महंत योगिनाथ दत्त महाराज व रा.स्व.संघाचे माननीय जिल्हा संघचालक श्री गुलाबसिंग दादा वसावे यांनी उपस्थितांना अभियानाची माहिती दिली आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत हे अभियान आणि त्याअनुषंगाने प्रभू श्रीराम हे जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचवता येतील याविषयी आवाहन केले.
श्री गुलाबसिंग दादा वसावे यांनी उपस्थित संत धर्माचार्यासमोर रामजन्मभूमी संघर्षाचा ईतिहास मांडला ते म्हणाले १५२८ पासून आत्तापर्यत तीन लाख हिंदूनी आपले रक्त सांडले प्राण गमावले त्यातील दोन लाख संत होते .१९९० च्या कारसेवेत कारसेवकांवर गोळीबार झाला अनेक संत कारसेवक धारातिर्थी पडले पण प्रत्येक कारसेवकाने गोळी छातीवर झेलली कोणीही पाठ दाखवली नाही.हा आमचा ईतिहास आहे.त्यामुळे हे दगड विटांचे मंदिर नसून राष्ट्रमंदिर आहे.
संताची ताकद मोठी आहे.संताच्या शब्दाला किंमत आहे आपण योजून आपल्या प्रवचनातून किर्तनातून आवाहन केले तर मोठा रामभक्त परिवार या निधी संकलनाच्या उपक्रमात सहभागी होईल याची मला खात्री आहे.
संमेलन यशस्वीतेसाठी श्री धोंडीराम दादा शिनगार, श्री पुरुषोत्तम काळे सर , विहिप जिल्हा मंत्री श्री विजयराव सोनावणे तसेच अभियान प्रमुख श्री अजय कासार यांनी परिश्रम घेतले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *