शिरपूर ब्रेकिंग : 7 नवे कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ
शिरपूर (तेज समाचार डेस्क). भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 37 अहवालां पैकी 17 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. या अहवालात शिरपूरातील सात रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच फागणे येथील 40 वर्षीय पुरूष व 35 वर्षीय महिला तसेच नेर येथील 32 वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकुण रुग्णांची संख्या 411 पोहोचली आहे.
शिरपूर मध्ये मिळालेल्या 7 पॉजिटिव्ह रुग्णांमध्ये एक गोविंदनगर, आंबा गल्ली तीन, एक खटिक गल्ली, दो रुग्णांचा पत्ता शोधण्याचे काम चालू आहे. अशा प्रकार आजतागत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 111 वर गेली आहे.