
खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला कार्यक्रम रद्द
खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला कार्यक्रम रद्द
यावल ( सुरेश पाटील ): रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानात चालू वर्षी होणारे श्रीकृष्ण जयंती सोहळा व गोपाळकाला दहीहंडी कार्यक्रम कोरोना व्हायरस चे पाश्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण मंदिर संस्थानचे मठाधिपती प्रदीप महाराज यांनी दिली.
दरवर्षी श्रीकृष्ण जयंतीला मध्यरात्री 12 वाजता खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानात श्रीकृष्ण जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात व अति उत्साहाने साजरा केला जातो .तर दुसऱ्या दिवशी सजीव देखाव्यासहित कृष्ण लिलेचे दर्शन व दहीहंडीची गांवातून मिरवणूक काढण्यात येते.महानुभाव संप्रदायाचा ध्वज या दिवशी श्रीकृष्ण मंदिर संस्थानात जुना ध्वज बदलून नवीन ध्वज लावण्यात येतो असे विविध कार्यक्रम या दिवशी करण्यात येतात. मात्र कोरोना महामारीमुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.जर शासनाने परवानगी दिली तर मास्क व सोशल डिस्टिंगचे पालन करत साध्या पद्धतीने हे कार्यक्रम होतील अशी माहिती मठाधिपती प्रदिप महाराज यांनी दिली आहे.