
श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे”निराधार कुटुंबात साडी व फराळ वाटप
श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे”निराधार कुटुंबात साडी व फराळ वाटप
दोंडाईचा (वैभव करवंदकर ): दोंडाईचा येथील श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे निराधार कुटुंबातील भगिनींना साडी आणि दिवाळीचा फराळ वितरित करण्यात आला. प्रा. प्रकाश भांडारकर सर म्हणाले कि , ज्यांचे जिवाभावाचे आप्त स्वकीय सोबत आहेत त्यांची दिवाळी आपसुकच आनंदाची असते. आनंदाची देवाणघेवाण होते. गिफ्ट हस्तांतरित होतात. सुखाची रेलचेल असते. पण आनंदाला तरसलेली काही माणसे असतात जी एकेकटी
रहातात कुठल्याही आधाराविना. त्यांच्या दिवाळीत आनंद वाटण्याचा एक छोटासा प्रयत्न दोंडाईचा येथील “श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे” करण्यात आला. याप्रसंगी प्रा. प्रकाश भांडारकर (नामविश्व सह संपादक ) ,श्री पांडुरंग शिंपी (धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ), श्री सुरेश बागुल (म.का.सदस्य),श्री शरद पवार ( शिंदखेडा तालुका, अध्यक्ष),प्रा कैलास कापडणे ( अध्यक्ष संत नामदेव निराधार मंच दोंडाईचा )या सर्व सन्मित्रांनी प्रत्येक निराधार भगिनींना साडी आणि दिवाळीचा फराळ वितरित केला.