
अशा लोकांना गोळ्या घालून ठार करा : राज ठाकरे
मुंबई (तेज समाचार डेस्क): मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल…नोटांना थुंका लावत आहेत…भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत तर लोकांना विश्वास बसेल. यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. संपूर्ण देशात सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीच्यावेळी फर्मान मग आता का नाही, राज ठाकरे मौलींवर संतापले
निवडणुकीच्यावेळी कुठे मतदान करायचे याचं फर्मान सोडणारे मौलवी आता प्रबोधन करण्यासाठी पुढे का येत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर देशात आम्ही आहोतच, असा दमही त्यांनी भरला. काही लोक नियम पाळत नसल्याने लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आणखी मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असंही ते म्हणाले.