
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती
मुंबई (तेज समाचार डेस्क) : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तसेच दिशा सालियनने काही काळ सुशांतसोबत काम केलं होतं आणि सुशांतच्या निधनाच्या पाच दिवस आधी दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणाचा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, हे आता सीबीआय तपासून पाहत आहेत. दिशा सालियनचे कॉल डिटेल समोर आले आहेत ज्यातून समजलं की दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही अॅक्टिव्ह होता. दिशाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत
.दिशाच्या मृत्यूनंतर देखील तिचा फोन वापरला जात होता. अद्याप हे समजू शकलेलं नाही की तिचा फोन कोण वापरत होतं. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा फोन पोलिसांच्या कस्टडीत असायला हवा होता. जर फोन पोलिसांच्या ताब्यात होता तर त्या फोनचा वापर कोणी केला आणि जर पोलिसांनी फोन ताब्यात घेतला नाही तर तसं का केलं? दिशाच्या फोनच्या माध्यमातून इंटरनेटचादेखील वापर केला जात होता.