
धुळे : न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात साजरी झाली छत्रपति शिवाजी महाराज जयंती
धुळे (तेज समाचार डेस्क). धुळे येथे गल्ली क्रमांक पाच मधील जुनी दगडी शाळा. महानगरपालिकेच्या वतीने नंबर इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी सुरू करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यानंतर शाळेतील विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून विविध पोशाख परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय घोष करत परिसरातील विविध मार्गावरून रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.हि रॅल गल्ली नंबर 5 येथून मार्गस्थ झाली.नंतर गल्ली नंबर 6 आझाद नगर पोलीस स्टेशन मार्गाने,मिरच्या मारुती खुंट तेथून किसान बत्तीवाला खुंट व परत मनपा दगडी शाळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीत घोड्यावर स्वार असलेला लहान बालक छत्रपतींच्या वेशभूषेतील बाजूला असलेले भालेदारी मावळे व अन्य विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे परिसरात एक वेगळेच चैतन्य निर्माण झालं होते.