
शिरपूर येथे शिवसेनेचा संकटकाळात गोरगरिबांना मदतीचा हात
संसारोपयोगी साहित्याचे वाटप
शिरपूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा या संकटकाळात गोरगरीब, गरजू, उघड्यावर राहणाऱ्या उपाशी-तापाशी कुटूंबांना शिरपूर तालुका शिवसेनेने मदतीचा हात दिला. यासाठी शिरपूर तालुका पदाधिकारी विकास सेन यांनी परिश्रम घेत संसोरापयोगी साहित्य जमा करुन त्याचे वाटप शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना विषाणुमुळे सर्वत्र टाळेबंदी घोषीत केली आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत ज्यांचे हातावर पोट आहे अशा अत्यंत गोरगरीब व गरजू कुटूंबाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. अशा गरजू कुटूंबांना हाताला काम नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंपासून वंचित झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण या शिकवणनुसार शिरपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांनी स्वत: जाऊन गोरगरीब कुटूंबांना संसारोपयोगी सामग्रीचे केले.
या किराणा साहित्यामध्ये तेल, तांदुळ, पीठ, तुरदाळ, मीठाची पिशवी, धना पावडर, लाल मिरची, जीरे, साखर, चहा पावडर, अंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण आदी वस्तू होत्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख हिंमत महाजन, तालुका प्रमुख भरतसिंह राजपूत, शहरप्रमुख मनोज धनगर, विकास सेन, शिवआरोग्य सेनेचे तालुकाध्यक्ष डॉ.निखिल पंचवैद्य, कुलदीप राजपूत, विजय पवार, संभाजी पवार आदी उपस्थित होते.